IPL Auction 2025 Live

MHT CET 2024 Result Date: एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल यंदा 10 जून दिवशी; cetcell.mahacet.org वर पहा मार्क्स!

MHT-CET-2024, 22 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 (PCB ग्रुप) आणि 2 मे ते 16 मे 2024 (PCM ग्रुप) दरम्यान आयोजित करण्यात आली होती

Exam (PC - pixabay)

स्टेट कॉमन एन्टरन्स टेस्ट सेल महाराष्ट्र (State Common Entrance Test Cell, Maharashtra) कडून यंदा MHT CET 2024 च्या पीसीएम (PCM) आणि पीसीबी ग्रुप (PCB) साठी घेण्यात आलेल्या परीक्षेची निकाल तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा निकाल 10 जून दिवशी लागणार आहे. CET Cell ने निकालाच्या तारखांबद्दल परिपत्रक काढून माहिती दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहेत. cetcell.mahacet.org वर हा निकाल पाहता येईल तर डाऊनलोड करण्याची देखील सोय असणार आहे. mahacet.in आणि mahacet.org या वेबसाईट्स वर देखील निकाल पाहता येणार आहे.

MHT CET Results 2024 हा 10 जूनला जाहीर होईल तर सीईटी सेल कडून घेण्यात आलेल्या अन्य परीक्षांच्या निकालाच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

पहा सीईटी  परीक्षांच्या निकालाच्या तारखा

MHT CET 2024: June 10, 2024

BHMCT-CET 2024: June 11, 2024

BA/Bac -BEd CET 2024: June 12, 2024

DPN/PHN: June 12, 2024

MHMCT CET 2024: June 13, 2024

Nursing CET 2024: June 16, 2024

LLB 5 CET 2024: June 16, 2024

BMS/BBM CET 2024: June 17, 2024

सीईटी सेल कडून यापूर्वी देण्यात आलेल्या माहितीमध्ये 12 जून पूर्वी MHT CET 2024 चा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. MHT-CET-2024 च्या स्कोअर कार्ड मध्ये विद्यार्थ्यांचे त्यांच्या PCM/PCB ग्रुप नुसार पर्सेंटाईल दिलेले असतील.

MHT CET 2024 score कसा पहाल?

MHT-CET-2024, 22 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 (PCB ग्रुप) आणि 2 मे ते 16 मे 2024 (PCM ग्रुप) दरम्यान आयोजित करण्यात आली होती. परीक्षा दोन शिफ्टमध्ये 30 सत्रांमध्ये घेण्यात आली - पहिले सत्र सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र दुपारी 2 ते 5 असे होते. वरील परीक्षांसाठी एकूण 5100 प्रश्न वापरले होते ज्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश होता. 5100 प्रश्नांपैकी फक्त 47 unique question ID objections वैध ठरवण्यात आले आहेत.