Result | Pixabay.com

महाराष्ट्र सीईटी सेल कडून 3 वर्षाच्या एलएलबी कोर्स साठीच्या MH CET Law 2025 चा निकाल आज लागणार आहे. हा निकाल cetcell.mahacet.org वर विद्यार्थी पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना हा निकाल पाहण्यासाठी application ID आणि password आवश्यक आहे. ऑनलाईन स्कोअरकार्ड पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. MH CET 3-year LLB entrance exam यंदा 2 आणि 3 मे 2025 दिवशी घेण्यात आली आहे. या परीक्षेनंतर final answer key 13 जूनला प्रसिद्ध झाली आहे.

MH CET 3-year LLB CAP (केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया) समुपदेशन जुलै 2025 मध्ये ऑनलाइन पद्धतीने सुरू होण्याची अपेक्षा आहे. केवळ वैध गुणांसह परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवारच समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असतील. CAP-संबंधित अपडेट्ससाठी, उमेदवारांनी अधिकृत कौन्सिलिंग पोर्टल llb3cap24.mahacet.org ला भेट द्यावी.

MH CET 3-Year LLB Result 2025 कसा कराल डाऊनलोड?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • तुमचा रजिस्टर email ID आणि password ने लॉगईन करा.
  • “Scorecard" लिंक वर क्लिक करा.
  • MH CET 3-Year Law 2025 चा निकाल दिसेल.
  • आता हा निकाल डाऊनलोड करता येणार आहे.

3 वर्षांच्या एलएलबी कार्यक्रमासाठी एमएच सीईटी लॉ 2025 ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) आधारित पेपर म्हणून तयार करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण 120 वस्तुनिष्ठ प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो. ही परीक्षा 120 मिनिटे (2 तास) कालावधीत घेण्यात आली, ज्यामुळे उमेदवारांना सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. अधिकृत गुणांकन योजनेनुसार, उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जातो. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नाही.

MH CET 3-Year Law 2025 परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये घेण्यात आली, ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या भाषेचे माध्यम निवडण्याची परवानगी मिळाली होती.