नोकरीची संधी: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदे; जाणून घ्या सविस्तर

सरकारी किंवा शैक्षणीक क्षेत्रात नोकरी करु इच्छिणाऱ्या किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे नोकर भर्ती सुरु आहे. या संस्थेत विविध पदे भरायची असल्याने जागाही अधिक आहेत. आपणही या पदांसाठी अर्ज करु इच्छित असाल तर खालील माहितीवर काळजीपूर्वक लक्ष द्या.

नोकरीची संधी: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे विविध पदे; जाणून घ्या सविस्तर
New Job | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Various posts at Maharashtra University of Health Sciences, Nashik: सरकारी किंवा शैक्षणीक क्षेत्रात नोकरी करु इच्छिणाऱ्या किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे नोकर भर्ती सुरु आहे. या संस्थेत विविध पदे भरायची असल्याने जागाही अधिक आहेत. आपणही या पदांसाठी अर्ज करु इच्छित असाल तर खालील माहितीवर काळजीपूर्वक लक्ष द्या.

कक्ष अधिकारी / कक्ष अधिकारी (खरेदी ) / अधीक्षक - ८ पदे

शैक्षणिक अर्हता : पदवीधर आणि अनुभव

उच्चश्रेणी लघुलेखक- २ पदे

शैक्षणिक अर्हता : शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन आणि टंकलेखन १२०/५० शब्द प्रति मिनिटं, मराठी लघुलेखन आणि टंकलेखन १२०/४० शब्द प्रति मिनिटं आणि अनुभव

सहायक लेखापाल- २ पदे

शैक्षणिक अर्हता : वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि अनुभव

निम्नश्रेणी लघुलेखक- २ पदे

शैक्षणिक अर्हता : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी लघुलेखन आणि टंकलेखन १००/४० शब्द प्रति मिनिटं, मराठी लघुलेखन आणि टंकलेखन १००/३० शब्द प्रति मिनिटं आणि अनुभव

सांख्यिकी सहायक - २ पदे

शैक्षणिक अर्हता : सांख्यिकी किंवा बायोमेट्रीक्स किंवा इकॉनॉमेट्रीक्स किंवा मॅथेमॅटिकल इकॉनॉमेट्रीक्स ह्या शाखांमध्ये कमीत कमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर.

किंवा

ब. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर आणि अभ्यासक्रमात सांख्यिकी किंवा मॅथेमॅटिकल इकॉनॉमेट्रीक्स या विषयावर आधारित १०० गुणांच्या परीक्षेचा समावेश आवश्यक.

किंवा

क. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर आणि सांख्यिकी विषयातील पदव्यूत्तर पदविका.

किंवा

ड. गणित, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखांमध्ये कमीतकमी ४५ % गुणांनी पदव्युत्तर आणि डेमोग्राफी अथवा पॉप्युलेशन सायन्स ह्या विषयांत प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

किंवा

इ . मास्टर्स ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन आणि गणित, अर्थशास्त्र, सांख्यिकी किंवा वाणिज्य ह्या शाखांमधील कमीत कमी ४५% गुणांनी पदव्युत्तर.

वरिष्ठ सहायक- ६ पदे

शैक्षणिक अर्हता : पदवीधर आणि अनुभव

विद्युत पर्यवेक्षक- १ पद

अ. विद्युत अभियांत्रिकी विषयाची पदवी अथवा पदविका आणि विद्युत पर्यवेक्षकाचा आणि अनुभव

किंवा

ब. २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन/ वायरमेन ट्रेड उत्तीर्ण आणि नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड चे प्रमाणपत्र आणि विद्युत पर्यवेक्षकाचे शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र.

किंवा

क. २ वर्षांचा आय. टी. आय ( इलेक्ट्रिशियन/ वायरमेन) कोर्स उत्तीर्ण आणि १ वर्षाचा विद्युत प्रशिक्षणाचा शासनातर्फे दिला गेलेला परवाना.

छायाचित्रकार- १ पद

शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. छायाचित्रण किंवा कमर्शियल आर्टस् किंवा फाईन आर्टस् ह्या विषयांमध्ये पदविका अथवा छायाचित्रणाचा किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आणि अनुभव.

वरिष्ठ लिपिक/ डीईओ - ८ पदे

शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. टंकलेखन वेग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिटं आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिटं.

लघु टंकलेखक- १२ पदे

शैक्षणिक अर्हता : नामांकन करून नियुक्तीला पात्र होण्यासाठी उमेदवार अ . उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखन वेग कमीत कमी ८० शब्द प्रति मिनिटं. टंकलेखनअपेक्षित वेग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिटं आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिटं. शासकीय नोकरीत कार्यरीत नसल्यास वय १८ वर्षाहून अधिक.

असिस्टंट कम ऑडियो/व्हिडियो एक्स्पर्ट- १ पद

शैक्षणिक अर्हता : अप्लायीड आर्टस् किंवा फाईन आर्टस् ह्या विषयांमध्ये पदविका अथवा छायाचित्रणाचा किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स आणि कामाचा अनुभव आणि अनिवार्य.

लिपिक कम टंकलेखक/ डीईओ/ रोखपाल/ भंडारपाल- ३९ पदे

शैक्षणिक अर्हता : अ. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, टंकलेखनाचा अपेक्षित वेग इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिटं आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिटं.

वीजतंत्री- २ पदे

शैक्षणिक अर्हता : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आय. टी. आय ( इलेक्ट्रिशियन/ वायरमेन) कोर्स प्रमाणपत्र आणि शासनातर्फे मिळणार अधिकृत वीजतंत्री परवाना असणे आवश्यक आणि अनुभव अनिवार्य.

वाहन चालक- १ पद

शैक्षणिक अर्हता : वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना. ४ थीची परीक्षा उत्तीर्ण, मराठी, इंग्रजी हिंदी ह्या भाषांमध्ये संभाषण करण्याची क्षमता. वाहन चालवण्याचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव आणि वाहन खराब झाल्यास नीट करण्याची क्षमता. भौगोलिक ज्ञान असणे आवश्यक.

शिपाई- ८ पदे

शैक्षणिक अर्हता : ४ थी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :- कमाल ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथील)

दरम्यान, वरील पदासाठी आपल्याला अधिक माहीत हवी असल्यास आपण bit.ly/2xVX27b या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तर, थेट अर्ज करण्यासाठी bit.ly/2O3wls1 तुम्ही या संकेतस्थळावर अर्ज करु शकता.

(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2019 10:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).