JEE Advanced Results 2020 Date: 5 ऑक्टोबरला जाहीर होणार जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा निकाल; jeeadv.nic.in वर असे पहा मार्क्स

आयआयटी दिल्ली म्हणजेच The Indian Institute of Technology (IIT) Delhi कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल 5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे

Representational Image (Photo Credits: Pixabay)

JEE Advanced Results 2020: आयआयटी दिल्ली म्हणजेच The Indian Institute of Technology (IIT) Delhi कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चा निकाल (JEE Advanced Results)  5 ऑक्टोबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. यंदा कोरोनाच्या सावटाखाली पार पडलेल्या या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता आहे. आयआयटी दिल्लीने यंदा जेईईचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच jeeadv.nic.in वर जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थी या अधिकृत संकेतस्थळावर आपले मार्क्स पाहू शकणार आहेत.

देशभर कोरोना व्हायरसचा फैलाव होत असतानादेखील पुरेशी खबरदारी घेत देशभर विविध परीक्षाकेंद्रांवर 27 सप्टेंबर दिवशी ही परीक्षा पार पडली आहे. सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 2.30 ते 5.30 या दोन टप्प्यामधेय लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. दरम्यान कालच जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेची  निकाल तारीख वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.

कसे पहाल तुमचे जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 चे मार्क्स ?

इंजिनियरिंग प्रवेशासाठी अत्यावश्यक असणार्‍या या परिक्षेच्या माध्यमातून सुरूवातीला विद्यार्थी जेईई मेन्सची परीक्षा देतात. त्यामधून पहिले अडीच लाख रॅन्क होल्डर्स जेईई अ‍ॅडव्हान परीक्षा देतात. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 1.6 लाख विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले. आता जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल लागल्यानंतर देशातील 23 आयआय टीमध्ये यंदाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत.