JEE Advanced Result 2019 Declared: IIT-JEE प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला, jeeadv.ac.in वर असा पाहा निकाल

यामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूरमधला कार्तिकेय गुप्ता याने तब्बल 100 पर्सेन्टाइल मिळवून देशातून पहिला येण्याचा मान आपल्या नवी केला आहे.

(Photo Credits: Allen Career Institute)

Indian Institute Of Technology (IIT)  या ख्यातनाम शिक्षणसंस्थेत प्रवेशासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी 'IIT-JEE' ची परीक्षा देतात. या परीक्षार्थींच्या मेहनतीचा निकाल आज सकाळी जाहीर झाला यामध्ये महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता (Kartikey Gupta)  या विद्यार्थ्याने सर्वाधिक गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. je&erdved.aced.in या अधिकृत वेबसाइटवर आज सकाळपासून ऑनलाइन निकाल पाहता येत आहे.यंदा 27 मे ला आयआयटीमार्फत ही परीक्षा देशभरात पार पडली होती यावर्षी पहिल्यांदाच या निकालासाठी पर्सेन्टाइल पद्धतीचा वापर करण्यात आला होता. याप्रमाणे पूर्ण 100 पर्सेन्टाइल म्हणजेच 372 पैकी 346 मार्क्स मिळवून कार्तिकेयने देशातून पहिला क्रमांक पटकावला आहे.यापाठोपाठ अलाहाबादच्या हिमांशू सिंग दुसरा याने तर दिल्लीच्या अर्चित बबना याने तिसरा क्रमांक आपल्या नावी केला आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार कार्तिकेय हा मूळचा चंद्रपूर येथील बल्लारपूरचा रहिवाशी असून मागील दोन वर्षांपासून तो मुंबईत अॅलन करिअर इन्स्टिट्युट मध्ये शिकत होता. हे करिअर इन्स्टिट्यूट म्हणजे आयआयटी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचे जाळे आहे ज्याची मूळ शाखा कोटा मध्ये असल्याने यापूर्वी विद्यार्थ्यांना तिथून शिक्षण घ्यावे लागायचे मात्र यंदा ही सुविधा मुंबईत सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. कार्तिकेयने आपल्या यशाचे गुपित सांगताना म्हंटले की, नियमित अभ्यास, गणित- विज्ञान विषयांची आवड आणि स्मार्ट फोनच्या आहारी न जात केलेला स्मार्ट वापर यामुळे हे यश शक्य झाले आहे.

असा पाहा निकाल

– jeeadv.ac.in  &erdved.aced.in, cbseresults.nic.in किंवा results.nic.in या अधिकृत बेबसाइट्सवर लॉग इन करा

– होमपेजवरील जेईई परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.

– तुमचा रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर, नाव आणि जन्म दिनांक नमूद करा आणि सबमिटवर क्लिक करा.

– तुमच्या मोबाइल किंवा कंप्युटर स्क्रीनवर निकाल दिसू लागेल.

– निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

जेईई प्रवेशप्रक्रिया ही जेईई मेन आणि जेईई ऍडव्हान्स अशा दोन स्तरावर पार पडते. यंदा माईन परीक्षेसाठी तब्बल अडीच लाख विद्यार्थी बसले होते त्यातरील 1.6 लाख विद्यार्थ्यांची ऍडव्हान्स परीक्षेसाठी निवड झाली होती. आज लागलेल्या निकालानंतर NITs, IIITs, आणि GFTIs. या देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाला सुरवात होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif