ISRO JTO Recruitment: सरकारने सरकारी नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो मध्ये एचएसएफसी मध्ये भरतीसाठी जाहीरात काढली आहे. इस्रोने 30 ऑक्टोंबरला जाहीर करण्यात आलेल्या नोटीस नुसार, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर (जेटीओ0 पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या द्वारे जेटीओच्या एकूण 6 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामधील 5 पद ही अनारक्षित असून अन्य एक पद अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी आरक्षित आहे.(Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी; 21 नोव्हेंबर पर्यंत rrc-wr.com वर करा ऑनलाईन अर्ज)
इस्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट isro.gov.in येथे भेट द्यावी. येथे उपलब्ध असलेल्या फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना 20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार असून त्यासाठी 250 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी त्यांनी एसबीआयचे चलन भरावे.(MPSC: एमपीएससीच्या लिपिक टंकलेखक व कर सहायक पद भरतीकरिता पात्रता परिक्षा घेण्याचा मंडळाचा निर्णय)
जेटीओ भरतीसाठी अधिसुचनेनुसार अर्ज करणअयासाठी जे उमेदवार पात्र आहे त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा उच्च शिक्षण संस्थेतून हिंदीत मास्टर्स डिग्री घेतलेली असावी. त्याचसोबत उमेदवाराचे वय 20 नोव्हेंबर 2021 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आणि 35 वर्षापेक्षा अधिक नसावे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अनारक्षित पदासाठी आरक्षित वर्गातील अधिकतम वयात सूट दिली जाणार आहे.