CA Foundation Exam 2021: ICAI कडून यंदा सीए फाऊंडेशन परीक्षा 24 जुलै पर्यंत लांबणीवर; लवकरच जाहीर होणार सविस्तर वेळापत्रक

9 जून ते 11 जून या वेळेत ही सोय परीक्षार्थ्यांसाठी खुली असेल

Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

The Institute of Chartered Accountants of India अर्थात ICAI ने यांच्याकडून यंदाची CA Foundation Exam देशातील कोविड 19 परिस्थिती पाहता लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान यंदा सीए ची परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून दिवशी आयोजित करण्यात आली होती. पण नव्या वेळापत्रकानुसार आता या परीक्षा 24 जुलै 2021 पासून घेण्यात येणार आहेत. याचं सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

दरम्यान मे-जुलै 2021 सत्रातील परीक्षांसाठी परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी ऑनलाईन विंडो 9 जून ला उघडण्यात येणार आहे. 9 जून ते 11 जून या वेळेत ही सोय परीक्षार्थ्यांसाठी खुली असेल . ही ऑनलाईन विंडो फॅसिलिटी icaiexam.icai.org वर उपलब्ध असेल.

ट्वीट

यंदा ICAI CA 2021 परीक्षा अंतर्गत फाऊंडेशन कोर्ससाठी अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस 20 एप्रिल पासून सुरू करण्यात आले आहे. सोशल मीडीयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ऑनलाईन मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा निर्णय मोठा दिलासादायक आहे. देशभरात 10वी, 12वीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार आणि देशातील अनेक राज्य सरकार कडून घेण्यात आला आहे. बोर्ड परीक्षा यंदा रद्द झाल्या असल्या तरीही अनेक प्रवेश परीक्षांच्या तारखांवर आणि परीक्षेच्या स्वरूपावर अनिश्चितता अद्यापही कायम आहे.