ICAI CA July 2021 Exam Admit Cards: सीए च्या जुलै सत्रातील परीक्षांसाठी अ‍ॅडमीड कार्ड्स icaiexam.icai.org वर जारी

विद्यार्थ्यांनाच अधिकृत संकेतस्थळावरून अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

The Institute of Chartered Accountants of India कडून आज (21 जून) अपेक्षेप्रमाणे जुलै महिन्यात होणार्‍या Foundation, Intermediate (IPC), Intermediate, Final and Final-New अशा सीए परीक्षांचे अ‍ॅडमिड कार्ड्स जारी करण्यात आले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी रजिस्टर केले आहे त्यांना icaiexam.icai.org या अधिकृत संकेतस्थळावरून आपलं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. CA Foundation Exam 2021: ICAI कडून यंदा सीए फाऊंडेशन परीक्षा 24 जुलै पर्यंत लांबणीवर; लवकरच जाहीर होणार सविस्तर वेळापत्रक.

यंदा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल अ‍ॅडमिट कार्ड दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनाच अधिकृत संकेतस्थळावरून अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढण्याचं आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हे कार्ड डाऊनलोड करण्यासाठी icaiexam.icai.org वर सिंगल साईन अकाऊंट वर लॉगिंग करावं लागणार आहे.

ICAI CA July exam admit card 2021 डाऊनलोड कसं कराल?

दरम्यान यंदा सीए ची परीक्षा 24, 26, 28 आणि 30 जून दिवशी आयोजित करण्यात आली होती. पण नव्या वेळापत्रकानुसार आता या परीक्षा 24 जुलै 2021 पासून घेण्यात येणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून ही परीक्षा देशातील कोविड परिस्थिती पाहता लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती पण आता सीएची परीक्षा तारीख आणी अ‍ॅडमीट कार्ड्स देखील जारी करण्यात आली आहे.