IBPS PO Prelims Admit Card 2020 जारी; उमेदवारांना 11 ऑक्टोबर पर्यंत ibps.in वरून करता येणार डाऊनलोड

इन्स्टिट्युट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) कडून आज (22 सप्टेंबर) IBPS PO Prelims Admit Card 2020 जारी करण्यात आले आहे.

Online Application | Photo Credits: Pixabay.com

इन्स्टिट्युट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) कडून आज (22 सप्टेंबर) IBPS PO Prelims Admit Card 2020 जारी करण्यात आले आहे. दरम्यान या परीक्षेसाठी समोरे जाणार्‍यांना त्यांचे कॉल लेटर म्हणजेच हॉल तिकीट/ अ‍ॅडमीट कार्ड्स ही ibps.in या IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. दरम्यान ही अ‍ॅडमीट कार्ड्स 22 सप्टेंबरते 11 ऑक्टोबर दरम्यान डाऊनलोड करण्याची मुभा आहे.

दरम्यान प्रिलिम परीक्षा 3 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर दिवशी होणार आहे. त्यासाठी देशभरात विविध ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. दरम्यान ही परीक्षा केंद्र उमेदवारांच्या पसंती क्रमानुसार आहेत. लेह मध्ये विशेष केंद्र असेल अशी माहिती देण्यात आली आहे. मग पहा तुम्ही देखील या परीक्षेला सामोरे जाणार असाल तर IBPS PO Prelims Admit Card 2020 डाऊनलोड कसं कराल?

IBPS PO Prelims Admit Card 2020 डाऊनलोड कसं कराल?

  • ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होम पेज वर IBPS PO Prelims Admit Card 2020 link वर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तेथे तुम्हांला login credentials साठी माहिती भरावी लागेल.
  • लॉगिन साठी योग्य तपशील भरल्यानंतर तुम्हांला अ‍ॅडमीट कार्ड पाहता येणार आहे.
  • तुम्ही अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.

online preliminary examination ही 100 मार्कांची परीक्षा असते. त्यासाठी तासाभराचा अवधी असतो तर 3 विभागांमध्ये इंग्रजी, Quantitative Aptitude आणि reasoning Ability तपासण्यासाठी प्रश्न असतात. विद्यार्थ्यांना या तिन्ही परीक्षांमध्ये कट ऑफ नुसार मार्क्स मिळवणं गरजेचे आहे.

IBPS PO 2020 यंदा नोकरभरती 1417 जागांसाठी आहे. देशभरातील विविध बॅंकांमध्ये ही भरती होईल. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातच या परीक्षेचा निकाल लागण्याची शक्यता आहे. प्रिलीम पास झालेल्यांनाच मुख्य परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा 28 नोव्हेंबर दिवशी असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now