IBPS PO 2020: आईबीपीएस मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी साठी नोकरभरती; ibps.in वर 26 ऑगस्ट पर्यंत करू शकता अर्ज
बँक ऑफ इंडिया (734जागा), पंजाब आणि सिंध बँक (83 जागा) आणि (युको बँक 350) बॅंक ऑफ महाराष्ट्र (250) पदांसाठी भरती निघाली आहे.
इन्स्टिट्युट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection)कडून यंदा IBPS PO 2020 अंतर्गत 1417 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याचं अधिकृत नोटिफिकेशन ibps.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करू शकतात. प्री एक्झाम ट्रेनिंगसाठी सप्टेंबर 2020 होणार असून त्याचे कॉल लेटरदेखील दिले जाणार आहे.
दरम्यान कोणत्याही शाखेतील पदवीधर या IBPS PO 2020 नोकरभरतीमध्ये अर्ज दाखल करू शकतो. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) या पदांसाठी हे अर्ज मागवण्यात आले असून बँक ऑफ इंडिया (734जागा), पंजाब आणि सिंध बँक (83 जागा) आणि (युको बँक 350) बॅंक ऑफ महाराष्ट्र (250) पदांसाठी भरती निघाली आहे.
इच्छुक उमेदवाराला परीक्षेसाठी अर्ज करताना 850 रूपये फी आकारली जाणार आहे. SC/ST/PWD वर्गातील लोकांना हे शुल्क 175 रूपये असेल. दरम्यान ऑनलाईन मोडच्या माध्यमातून ही फी घेतली जाणार आहे. अधिक माहितीसाठी IBPS च्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
IBPS PO 2020 नोकरभरती साठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. देशभर विविध सेंटर्समध्ये या परीक्षा होतील. सध्या जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये अंदाजे परीक्षा केंद्र काय असू शकतील याची यादी दिली आहे.