Foreign Education: उच्च शिक्षणासाठी 67% भारतीय निवडतात 'हा' देश- रिपोर्ट

त्यानंतर मग फ्रान्स आणि इतर देशांचाही समावेश होतो.

Foreign Education | Representative Image (Photo Credits: Pixabay)

विदेशात जाऊन शिक्षण (Foreign Education) घेणे हे बहुतांश भारतीय तरुण आणि त्यांच्या आई-वडीलांचे मुलांबाबतचे स्वप्न असते. त्यातही विदेशात कोणत्या देशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे याबाबतही अनेकांची मतं, स्वप्न आणि प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. फिन-टेक प्लॅटफॉर्म प्रोडिजी फायनान्स (Fin-Tech Platform Prodigy Finance) नावाच्या संस्थेने याबाबत एक सर्वेक्शन केले. या सर्वेक्शनातील अभ्यासातून आलेला निष्कर्ष असा की 67% भारतीयांना वाटते की आपण यूएसए (USA) म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (United States of America) येथे शिक्षण घ्यावे. काही भारतीय युके (UK) आणि फ्रान्सलाही (France) प्राधान्य देतात.

स्टेट ऑफ हायर एज्युकेशन इन स्टडी अब्रॉड मार्केटच्या या अहवालातून पुढे आले आहे की, अमेरिकेशिवाय भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यास यूके (UK) म्हणजेच युनायटेड किंग्डमला (United Kingdom) प्राधान्य देतात. त्यानंतर मग फ्रान्स आणि इतर देशांचाही समावेश होतो. परंतू, यूके आणि फ्रान्स देशांना प्राधान्य देणाऱ्या भारतीयांचे प्रमाण केवळ 8% आहे. (हेही वाचा, Job Recruitment: IT क्षेत्रातील लोकांसाठी मोठी बातमी; Infosys, HCL Tech, TCS आणि Wipro देणार 1 लाख फ्रेशर्सना नोकऱ्या)

उच्चशिक्षणासाठी विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली राज्यातील आढळले. त्यांचे प्रमाण खालील प्रमाणे-

दरम्यान, या अहवालात असेही पुढे आले की, विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीयांमध्ये 70% पुरुष तर महिलांचे प्रमाण केवळ 30% इतके आहे. तसेच, अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी नॉर्थ ईस्टर्न यूनिवर्सिटी, अर्लिंगटोन मध्ये टेक्सास विद्यापीठ आणि स्टीवंस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ही भारतीय विद्यार्थ्यांची सर्वात प्राधान्याची विद्यापीठं राहिली. एमबीए करण्यासाठी डॉर्ज टाऊन विद्यापीठ, टोरंटो विद्यापीठ आणि रोचेस्टर विद्यापीठ हेदेखील सर्वात लोकप्रिय ठरले.

उच्च शिक्षणासाठी विदेशात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक गंभीर अशी अनिश्चितता आढळली. कारण गेल्या वर्षी देशव्यापी लॉकडाऊनच्या संकटामुळे भारतातील बहुतांश कुटुंबं ही आर्थिक गर्तेत ढकलली गेली. तरीही 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये विदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश अर्जांमध्ये 41% वाढ झाली आहे. 2018 मध्ये हेच प्रमाण 108% होते.