CBSE Board Exams 2021 ऑनलाईन नव्हे तर लेखी परीक्षेच्या स्वरूपातच होणार; बोर्डाच्या अधिकार्यांची माहिती
सीबीएसई बोर्डाकडून आगामी बोर्ड परीक्षांसाठी अद्याप तारखा जाहीर झाल्या नसल्या तरीही CBSE Board Exams 2021 या ऑनलाईन नव्हे तर आतापर्यंत जशा ऑफलाईन म्हणजेच लेखी स्वरूपात होतील.
सीबीएसई बोर्डाकडून आगामी बोर्ड परीक्षांसाठी (CBSE Board Exams 2021) अद्याप तारखा जाहीर झाल्या नसल्या तरीही CBSE Board Exams 2021 या ऑनलाईन नव्हे तर आतापर्यंत जशा ऑफलाईन म्हणजेच लेखी स्वरूपात घेण्यात आल्या होत्या तशाच त्या घेतल्या जातील असं सांगण्यात आले आहे. CBSE spokesperson Rama Sharma यांनी यंदाच्या सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या तारखा आणि परीक्षा पॅटर्न बद्दल माहिती दिली आहे. त्यावेळेस त्यांनी प्रॅक्टिकल परीक्षांबद्दल देखील माहिती देखील आहे.
शर्मा यांनी दिलेल्या माहिती नुसार, प्रॅक्टिकल परीक्षा जर विद्यार्थी वर्गामध्ये देऊ शकत नसतील तर त्यांच्यासाठी काही पर्यायी मार्गांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र सार्या परीक्षा घेताना बोर्डाकडून कोविड 19 गाईडलाईनचे पालन केले जाईल. न्यू नॉर्मल स्वीकारत सार्या प्रोटोकॉलचं पालन केले जाणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल हे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासोबत 3 स्तरावर चर्चा करणार आहेत. यामध्ये परीक्षा सुरक्षितपणे कशा घेतल्या जाऊ शकतात याचा विचार केला आहे. दरम्यान त्यानंतर वेबिनारच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांसोबत देखील संवाद साधणार आहेत. त्यासाठी ते 3 विविध तारखेला हा वेबिनार आयोजित करणार आहेत.
ऑनलाईन शिक्षण हे निश्चित आव्हानात्मक आहे. शाळा, कॉलेजपासून दूर असणार्यांनी या आव्हानाकडे देखील सकारात्मकतेने पाहणं गरजेचे आहे.