CBSE Board Exam 2024 Dates: सीबीएसई ची 10वी, 12वी बोर्ड परीक्षा यंदा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल

सीबीएससीने हे वेळापत्रक जारी करत शाळांना यानुसार त्यांच्या वर्षभरातील इतर परीक्षा आण कामकाजांचं आयोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

CBSE | Twitter

Central Board of Secondary Education कडून CBSE Board Exam 2024 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा सीबीएसी बोर्डाची 10वी, 12वी ची परीक्षा फेब्रुवारी 15 ते एप्रिल 10 या दिवसांमध्ये पार पडणार आहे. सीबीएससी ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर याबाबतची माहिती आणि परिपत्रक दिले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक cbse.gov.in या संकेतस्थळावरून याबाबतचं परिपत्रक पाहू शकतात.

यंदा सीबीएससी बोर्डाची 10वी, 12वीची परीक्षा सुमारे 55 दिवस चालणार आहे. सीबीएससीने हे वेळापत्रक जारी करत शाळांना यानुसार त्यांच्या वर्षभरातील इतर परीक्षा आण कामकाजांचं आयोजन करण्याचा सल्ला दिला आहे. नक्की वाचा: CBSE बोर्डाचा दिलासा; परदेशात विद्यार्थ्यांना सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रवेशासाठी आता बोर्डाकडून पूर्व परवानगीची गरज नाही .

CBSE Board Exam 2024 ची नोटीस कशी कराल डाऊनलोड?

दरम्यान सीबीएससी बोर्डाच्या अन्य तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. इथे पहा अधिकृत नोटीस.  

विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे आणि पुढील परीक्षांचे नीट नियोजन करता यावं यासाठी परीक्षेच्या तारखा काही महिने आधीच जाहीर केल्या जातात. या तारखांनंतर आता विद्यार्थ्यांना पुढील काही महिन्यात सविस्तर वेळापत्रक देखील दिले जाईल.