CA Exam May 2024 New Schedule: सीए च्या मे महिन्यातील परीक्षांचं नवं वेळापत्रक जारी; पहा इथे
नव्या वेळापत्रकानुसार, intermediate course exam for Group 1 ची परीक्षा मे महिन्यामध्ये 3,5 आणि 9 दिवशी होणार आहे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार त्या मे महिन्यात 3,5,7 दिवशी आयोजित होती.
The Institute of Chartered Accountants of India कडून लोकसभा निवडणूक तारखांच्या पार्श्वभूमीवर नव्याने मे महिन्यात आयोजित परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकामध्ये परीक्षांच्या तारखा आणि मतदानाच्या तारखा सारख्याच होत असल्याने जुनं वेळापत्रक स्थगित केल्याची घोषणा केली होती आता नव्या वेळापत्रकानुसार, intermediate course exam for Group 1 ची परीक्षा मे महिन्यामध्ये 3,5 आणि 9 दिवशी होणार आहे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार त्या मे महिन्यात 3,5,7 दिवशी आयोजित होती.
intermediate course exam Group 2, मध्ये परीक्षा मे महिन्यात 11, 15 आणि 17 दिवशी आयोजित आहेत. या परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, मे महिन्यात 9, 11,13 दिवशी होणार होत्या. तर फायनल एक्झाम मध्ये ICAI ने घोषित केल्यानुसार, मे 2,4,8 दिवशी ग्रुप 1 ची परीक्षा आहे. आधी ही परीक्षा मे महिन्यात 2,4,6 दिवशी होती. तर ग्रुप 2 ची परीक्षा मे महिन्यात 10,14 आणि 16 दिवशी आहे. पूर्वी त्या परीक्षा मे महिन्यात 8,10,12 दिवशी होणार होत्या. CA Exams Postponement 2024: सीए परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकाची विद्यार्थ्यांना आतुरता असताना फेक शेड्युल वायरल; सोशल मीडीयातही मिम्स चा पाऊस!
पहा मे महिन्यातील सीए परीक्षेचं वेळापत्रक
शनिवारी 16 मार्च दिवशी भारताच्या 18व्या लोकसभा निवडणूकीचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. देशात 543 जागांवर 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान निवडणूका होणार आहेत. या वेळापत्रकाची घोषणा होताच सीए च्या मे महिन्यात होऊ घातलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय ICAI कडून घेण्यात आला.