Jobs In India: बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी! भारतात 2023 मध्ये 9 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता

पुढील वर्षात म्हणजे 2023 मध्ये 9 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

देशात दिवसेनदिवस बेरोजगारांच्या (Unemployment) संख्येत वाढ होत आहे. पदवीधर (Graduation) शिक्षण घेवून देखील अनेक तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. हल्ली सगळ्याचं क्षेत्रात नोकरीसाठी मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. नोकरीसाठी अर्ज (Application For Job) करणाऱ्यांची संख्या ही रिक्त जागांपेक्षा अधिक असल्याचं दिसून येत आहे. तरी पुढील वर्षात म्हणजे 2023 मध्ये 9 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागणी असलेल्या टॉप जॉब प्रोफाइलमध्ये (Top Job Profile) टेलिसेल्स एक्झिक्युटिव्ह, फील्ड सर्व्हे असोसिएट्स, डेटा अॅनालिस्ट, ग्राहक सेवा, वेअरहाऊस आणि डिलिव्हरी कर्मचारी, हाउसकीपिंग कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये निर्माण झालेल्या 8 दशलक्ष नोकऱ्यांपेक्षा भारताच्या नोकरी मार्केटमध्ये 2023 मध्ये विक्रमी 9 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

उत्पादन क्षेत्राकडून म्हणजेच ग्रीनफिल्ड प्रकल्प (Greenfield Project) आणि नवीन उपक्रमांसाठी तसेच बँकिंग (Banking) आणि फिनटेक क्षेत्रांकडून मागणीत मोठी वाढ बघायला मिळत आहे. याशिवाय सणासुदीपूर्वी मॉल्स (Malls) आणि फिजिकल स्टोअर्समध्ये वाढणारी गर्दी किरकोळ क्षेत्रातून येणाऱ्या मनुष्यबळाच्या मागणीत देखील भर घालत आहे. त्यामुळे यातील विविध कार्यालयात रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. (हे ही वाचा:- CUET UG 2022 Result: सीयूईटी यूजी परीक्षेचा निकाल जाहीर cuet.samarth.ac.in वर पहा स्कोअरकार्ड)

 

बेटरप्लेसच्या फ्रंटलाइन इंडेक्स रिपोर्ट 2022 मधील आकडेवारीनुसार, 12 टक्के मासिक सरासरी आणि मनुष्यबळाची कमतरता ही सर्व क्षेत्रातील कंपन्यांसाठी मोठी आव्हाने बनली आहेत. पण येणाऱ्या वर्षात विविध देशभरात विविध क्षेत्रात नोकरीची संधी मिळणार आहे. तरी बेरोजगार तरुणांसाठी 2023 मध्ये पुढील वर्षात नोकरीच्या उत्तम संधी आहे.