Viral Video: कहरच! दारूच्या नशेत तरुणांचा धिंगाणा, अर्धनग्न अवस्थेत कारच्या छतावर बसून दंगामस्ती
Uttra pradesh Video PC TWITTER

Viral Video: प्रयागराज येथील रस्त्यावर तरुणांचा दारूच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणांवर कारवाई केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण कारच्या छतावर बसून धिंगाणा घातल आहे. (हेही वाचा- उत्तर प्रदेशच्या मुझफ्फनगरमध्ये इमारत कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, कारवर एक तरुण अंगावरचे कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत एकमेकांवर दारून फेकत आहे. हा धागडधिंगाणा एकाने फोनमध्ये कैद केला आहे. सोशल मीडियावरील व्हायरल झालेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहे. तरुणांचा हा धिंगाणा संस्कृतीला लाजवेल अशी आहे. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून दारूच्या नशेत तरुणांचा गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाताच, त्यांच्यावर कारावाई सुरु केली.

ही घटना प्रयागराद स्टेशनच्या गेट क्रमांक २ समोर राधे लॉजजवळ ही घटना घडली. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी कारवाई सुरु करत तरुणांची कार जप्त केली आहे. अनेक युजर्संनी कारवाई करा अशी कंमेट केली आहे. दारूच्या नशेत खूप गोंधळ घातला आहे. त्यांना पाहून असे दिसून येते की,त्यांना पोलिसांची भीती उरलीच नाही.  अॅडव्होकेट मदन सरोज यांच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.