दिल्ली: आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीचा रेल्वे प्रवासावेळी विनयभंग
आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीचा रेल्वे प्रवासावेळी विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर दिल्ली येथून समोर आला आहे.
आइस्क्रीममध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीचा रेल्वे प्रवासावेळी विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर दिल्ली येथून समोर आला आहे.या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. हा प्रकार राजधानी एक्सप्रेसमध्ये घडला असल्याचे सांगितले जात आहे.
तरुणी ही महाविद्यालयात शिकत असून तिच्या ओळखीतल्या एका महिलेने याबद्दल ट्वीट करत या प्रकाराची माहिती दिली आहे. पीडित तरुणीला एक्सप्रेसमध्ये तिकिट तपासणी करणाऱ्या व्यक्तीने आणि पॅन्ट्री कर्मचाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला. तसेच पीडित तरुणीच्या आइस्क्रीमध्ये गुगींचे औषध देत हा प्रकार केला असल्याचे समोर आले आहे.
या प्रकारावर प्रथम तरुणीने तक्रार करण्यासाठी घाबरली होती. मात्र आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेची अधिक तपासणी केली जात असून तिकिट तपासणी करणाऱ्या व्यक्तीला आणि वेटरला नोकरीवरुन हाकलले आहे.