आप पक्षाच्या आमदाराने महिलेवर बलात्कार केल्याने गुन्हा दाखल
दिल्ली (Delhi) येथे आप (AAP) पक्षाच्या आमदाराने एका महिलेवर कार्यालयातच बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेकडून लावण्यात आला आहे.
दिल्ली (Delhi) येथे आप (AAP) पक्षाच्या आमदाराने एका महिलेवर कार्यालयातच बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेकडून लावण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार मोहिंदर गोयल असे आरोपीचे नाव आहे. तर पीडीत महिलेच्या नवऱ्याचे 2008 रोजी निधन झाले आहे. तसेच गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून ती पेन्शनच्या कामानिमित्तम गोयल याच्या संपर्कात आली होती. त्यावेळी कामानिमित्त आरोपी गोयल मला त्यांच्या घरी भेटायला बोलवत असत. अशाच एके दिवशी गोयल यांच्या घरी गेले असता त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर गोयल यांच्या कार्यालयातही मदत मागण्यासाठी गेली त्यावेळी ही त्यांनी माझ्यावर बलात्कार केल्याची पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे. तसेच स्थानिक नेत्यांकडे सुद्धा याबाबत मदत मागितली होती. मात्र त्यांनी ही मला साथ दिली नाही. मात्र काही दिवसात गोयल यांनी माझी माफी मागितल्याने त्यांना मी माफ केल्याचे पीडित महिलेने सांगितले.
मात्र गेल्या महिन्यात गोयल यांच्या भावाने पीडित महिलेला व्हॉट्सअॅपद्वारे अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठविले. तसेच पोलिसात याबाबत तक्रार करु नकोस अशी ही धमकी गोयल यांच्या भावाकडून देण्यात आली. मात्र अत्याचार असह्य झाल्याने महिलेने पोलिसात अखेर धाव घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत गोयल यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.