दिल्ली एनसीआर येथील एका रियल एस्टेट ग्रुपकडून 3,000 कोटी Black Money जप्त, आयकर विभागाची कारवाई
या वृत्तात म्हटले आहे की, गेल्या काही काळात या समुहाचा कारभार चालत असलेल्या 25 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत.
राजधानी दिल्ली एनसीआर येथील एका रियल एस्टेट समूहावर आयकर विभागाने छापा टाकला. या वेळी केलेल्या कारवाईत या समुहाने तब्बल 3000 कोटी रुपये इतका काळा पैसा (Black Money) स्वीकारल्याचे या समूहाने कबुल केल्याचे वृत्त आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Chairperson, Central Board of Direct Taxes) ने दिलेल्या माहितीनुसार प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. दरम्यान, सीबीडडीटी (CBDT) ने या समुहाचे नाव मात्र अद्याप जाहीर केले नाही.
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्ता हा रिएल इस्टेट समूह हा ओरिएंटल इंडिया ग्रुप (Oriental India Group) असल्याचे म्हटले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, गेल्या काही काळात या समुहाचा कारभार चालत असलेल्या 25 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले आहेत. हा ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर, माइनिंग आणि रियल इस्टेट के बिजनेस आदी क्षेत्रात कार्यकरत आहे. (हेही वाचा, डिसेंबर महिन्यात जवळजवळ 9 दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या पूर्ण सुट्ट्यांची लिस्ट)
प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे की, कॅश लेजर मध्ये सुमारे 250 कोटी रुपये इतका ब्लॅक मनी मिळाला असून, हा सर्व पैसा जप्त करण्यात आल्याचेही म्हटले आहे. या ग्रुपने अनेक प्रॉपर्टी ट्रांजेक्शनवरही कर भरला नाही. सुमारे 3.75 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ताही या ग्रुपकडून जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपने सुमारे 3000 कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे समजते. सोबतच या पैशावर कर न भरल्याचेही समोर येत आहे. आयकर विभागाच्या कारवाई नंतर या समुहाचे 32 बँक लॉकरही सील करण्यात आले आहेत.