Delhi Fire News: मुखर्जी नगर येथे लागलेल्या भीषण आगी प्रकरणात पीजी मालकाविरुध्दात गुन्हा दाखल, 35 पेक्षा जास्त मुलींना वाचवण्यात यश

या घटनेअंतर्गत पीजीच्या मालकाविरुध्द दिल्ली पोलीसांनी एफआयआर दाखल केला आहे.

Delhi fire News PC Twitter

Delhi Fire News: दिल्लीत बुधवारी संध्याकाळी मुखर्जी नगरमधील गर्ल्स पीजी वसाहतीला आग लागली होती. या घटनेअंतर्गत पीजीच्या मालकाविरुध्द दिल्ली पोलीसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांने दिलेल्या निवेदनानुसार, त्या व्यक्तीविरुध्द पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. भारतीय दंड संहिता नुसार, कलम 336, 337, 338 अंतर्गत मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी संध्याकाळी आग लागलेल्या मुखर्जी नगरमधील गर्ल्स पीजी वसाहतीच्या मालकाविरुद्ध दिल्ली  एफआयआर दाखल केला आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनानुसार, त्या व्यक्तीविरुद्ध पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही आग कशी लागली आहे या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे.वसतिगृहाला आग लागल्याने एका लहान मुलासह 35 पेक्षा जास्त मुलींना वाचवण्यात यश आले, वसतिगृहाला आग विझवण्यासाठी 20 अग्निशमन गाड्या त्या ठिकाणी पाठवण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

 

मुखर्जी नगरच्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत पाच मुलींना दाखल करण्यात आले असून त्यात एक दोन-तीन वर्षांचा मुलगाही आहे. त्यापैकी एकाचीही प्रकृती गंभीर नसल्यामुळे समजते आहे. लवकरच त्या व्यक्तीवर चौकशीते आदेश देण्यात येणार आहे.