Man Dies During Gym Workout: जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना विजेचा धक्का लागून दिल्लीतील इंजिनिअरचा मृत्यू
रोहिणी येथील सेक्टर 19 मध्ये राहणारा सक्षम हा जिमप्लेक्स फिटनेस झोन, सेक्टर 15, रोहिणी येथे व्यायाम करत असे. ही घटना मंगळवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जिममधील ट्रेडमिलवर सक्षम धावत असताना घडली.
Man Dies During Gym Workout: उत्तर दिल्लीतील (North Delhi) रोहिणी (Rohini) येथे मंगळवारी एका जिममध्ये ट्रेडमिलवर (Treadmill) धावताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जिम मालकावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. सक्षम प्रुथी (वय, 24) असे मृताचे नाव आहे. सक्षक हा बीटेक पदवीधर होता आणि गुरुग्राममधील एका कंपनीत काम करत होता.
रोहिणी येथील सेक्टर 19 मध्ये राहणारा सक्षम हा जिमप्लेक्स फिटनेस झोन, सेक्टर 15, रोहिणी येथे व्यायाम करत असे. ही घटना मंगळवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जिममधील ट्रेडमिलवर सक्षम धावत असताना घडली. (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूर मधील महिलांवरून क्रुर अत्याचारांच्या वायरल व्हिडीओ ची SC कडूनही दखल; सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश)
#Delhi man electrocuted while running on treadmill at gym | @arvindojha https://t.co/NT7iIyohL1
— IndiaToday (@IndiaToday) July 20, 2023
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी मृत्यूचे कारण विद्युत शॉक असल्याचे पुष्टी केली आणि कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती दिली.
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

