Delhi Election 2025 Results: दिल्ली नेमकी कोणाची? सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात, आज निकाल होणार जाहीर

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासह दिल्लीतील इतर ६९ मतदारसंघांची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. या मतदारसंघात आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये आपचे अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश साहिब सिंह वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचा समावेश आहे.

Delhi Election Result 2025 (Photo Credits: LatestLY)

Delhi Election 2025 Results: नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासह दिल्लीतील इतर ६९ मतदारसंघांची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. या मतदारसंघात आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये आपचे अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश साहिब सिंह वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 चा निकाल आज जाहीर होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात ६०.४२ टक्के मतदान झाले असून आता 'आप' सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की २७ वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला ३६ जागांचे बहुमत अपेक्षित आहे.

दिल्लीत आता कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष: 

'आप'चा विजय झाल्यास अरविंद केजरीवाल यांचा हा दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची तिसरी टर्म असेल.  दिल्लीमध्ये जर आम आदमी पार्टी जिंकली, तर हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्यांदा सरकार बनवण्याचा रेकॉर्ड असेल. मुख्य लढत आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात आहे. जर भाजप जिंकला तर 27 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येईल.

एक्झिट पोल आणि सर्वेक्षणचा आढावा घेतला तर, त्यांचे निकाल काय सांगतात याकडे आपण पहिले तर असे दिसून येते कि, P-Marq Peoples Pulse, JVC Poll, People's Insight आणि Chanakya Strategies च्या निवडणूक सर्वेक्षणानुसार भाजपला विजय मिळवण्याची शक्यता आहे आणि 'आप'ला धक्का बसू शकतो. तसेच  Mind Blink आणि Wee Preside च्या सर्वेक्षणांमध्ये 'आप'ला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, मातृज एक्झिट पोलनुसार एक अंदाज असाहि आहे कि,  दिल्लीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळवता येणार नाही.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते कि, येत्या 5 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत 'आप'ला ७० पैकी ५५ जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान, कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही, तर दिल्लीमध्ये सरकार बनवण्यासाठी आघाडीची आवश्यकता भासू शकते. तर दिल्लीत कोणते पक्ष बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now