Dog Walker Beats Husky: पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण, गुडगाव येथील घटना CCTV कैद
मुक्या प्राण्यांना अमानुष मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात आणखी नवीन एक व्हिडिओ समोर आला आहे. सोसायटीमधील लिफ्टमध्ये कुत्र्याला त्याचा वॉकरने मारहाण केली.
dog walker beats Husky: मुक्या प्राण्यांना अमानुष मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात आणखी नवीन एक व्हिडिओ समोर आला आहे. सोसायटीमधील लिफ्टमध्ये कुत्र्याला त्याचा वॉकरने मारहाण केली. ही घटना लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ३० जून रोजी ही घटना घडली आहे. लिफ्टमध्ये कोणी नसताना तरुणाने कुत्र्याला बेदम मारहाण केली आहे. (हेही वाचा- बिहारच्या वाल्मिकीनगरमध्ये सापडला दुर्मिळ तक्षक नाग
मिळालेल्या माहितीनुसार, गुडगाव येथील तत्वम सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. हस्की जातीचा कुत्रा आणि त्याचा वॉकर लिफ्टमधून घरी जात होते. त्यावेळी लिफ्टमध्ये कोणीच नसताना वॉकरने रागाच्या भरात कुत्र्याला पट्ट्याने मारले. ऐवढचं नव्हे तर त्याने अक्षर: कुत्र्याला फास लागेल अश्या पध्दतीने पकडलं. कुत्र्याला उचलून फेकले आणि त्याला शिवीगाळ देखील केली.
Witnessed a dog walker abusing a dog in Gurgaon's Tatvam Society. If you hire dog walkers, please monitor them closely. Animal abuse is unacceptable and these individuals must be held accountable. Authorities need to act swiftly. #StopAnimalAbuse #Gurgaon pic.twitter.com/75FAJnszfc
— Vidit Sharma 🇮🇳 (@TheViditsharma) July 1, 2024
ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्ट करणाऱ्या वापरकर्त्यांने सांगितले की, या तरुणांवर कारवाई झालीच पाहिजे. जर तुम्ही भाड्याने वॉकर घेत असाल तर कृपया त्यांचे बारकाईने निरिक्षण करा. प्राण्यांवरील अत्याचार अस्वीकार्य आहे. व्हायरल व्हिडिओला अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हल्ला करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा अशी विनंती केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणी प्रेमींचे मन दुखावले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2024 02:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

