COVID-19 Vaccination for Children: देशात मुलांच्या लसीकरणाची तयारी जोरात, आजपासून नोंदणी सुरू
वॅक्सिन स्लाट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे.
देशभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाने एकीकडे दहशत निर्माण केली असतानाच दुसरीकडे एक दिलासा देणारी बातमी आहे. खरं तर, 3 जानेवारीपासून देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांना (COVID-19 Vaccination for Children) कोरोना लसीचा डोस मिळणार आहे. यासाठीची नोंदणी देखील आजपासून सुरू होत आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना लहान मुलांसाठी कोरोना लसीकरणाची घोषणा केली होती. तेव्हापासून सगळ्या राज्यांनी तयारी सुरू केली आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) गाईडलाईन्स जारी केली आहे. CoWIN पोर्टलवर आपला वॅक्सिन स्लाट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे.
Tweet
भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. (हे ही वाचा दिलासादायक! '2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Covaxin सुरक्षित'- Bharat Biotech चा दावा.)
नोंदणी अशी असेल
मिळालेल्या माहितीनुसार, या वयोगटातील लसीकरणासाठी कोविड पोर्टलवर 1 जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरणादरम्यान वॉक-इन करूनही लसीकरण करता येईल. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावर प्राधान्याने लसीकरण सत्र आयोजित केले जाईल. भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुंलाना 28 दिवसांच्या अंतराने सह-लसीचे फक्त दोन डोस दिले जातील.
देशात कोरोना झपाट्याने वाढत आहे
देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाचा वेग पाहिला तर लहान मुंलानसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,764 नवीन रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 27.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात Omicron प्रकारांची प्रकरणे वाढून 1270 झाली आहेत. दिल्ली आणि मुंबईला ओमिक्रॉनचा सर्वाधिक फटका बसला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)