Coronavirus World Update: जगभरात कोरोनाची लाट ओसरली, संसर्गाचे प्रमाण 80% पेक्षाही कमी
कोरोनाव्हायरस (Coronavirus) महामारीने अवघ्या जगाला चिंतेत टाकले होते. अवघ्या जगासमोर आव्हान निरमाण झाले होते. अशा स्थितीत आता दिसासादायक वृत्त येत आहे. जगभरातील कोरोना व्हायरस महामारीचा आलेख आता उतरता पाहायला मिळतो आहे. जगभरातील कोविड-19 (COVID-19) संक्रमितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते आहे.
कोरोनाव्हायरस (Coronavirus) महामारीने अवघ्या जगाला चिंतेत टाकले होते. अवघ्या जगासमोर आव्हान निरमाण झाले होते. अशा स्थितीत आता दिसासादायक वृत्त येत आहे. जगभरातील कोरोना व्हायरस महामारीचा आलेख आता उतरता पाहायला मिळतो आहे. जगभरातील कोविड-19 (COVID-19) संक्रमितांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळते आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासावर लावलेलेल निर्बंधही कमी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी माहिती देताना सांगितले की, जगभरात 1 आठवड्यात सरासरी 26,49,005 कोरोना संक्रमित आढळून येत आहेत. ही संख्या सातत्याने घटते आहे. 26 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत प्रतिदीन कोरोना संक्रमितांची जगभरातील सरासरी संख्या 31,44,622 इतकी आढळून येत आहे.
गभरातील 140 देशांतून कोरोना संक्रमीतांची संख्या घटनाताना पाहायाला मिळते आहे. अवघ्या 10 देशांमधून 40% देश येतात. अमेरिका, फ्रान्स, इटली आणि स्पेन यादेशांमध्ये सातत्याने घट होताना दिसते आहे. भारतात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 7,90,789 इतकी आहे. पाठिमागील आठवड्यात दैनंदिन कोरोना संक्रमितांची संख्या 96,392 इतकी आढळून येत आहे. 21 जानेवारीला देशात 3,47,254 संक्रमित रुग्ण आढळले होते. आता त्यात 80% घट पाहायला मिळत असून, ती संख्या 67,084 इतक्या टप्प्यावर आली आहे.
लव अग्रवाल यांनी पुढे बोलताना म्हटले की, देशातील पॉझिटीव्हीटी दर 4.44% वर आला आहे. पन्नास हजार पेक्षाही अधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांची संख्या 8 वरुन घटून ती चारवर आली आहे. केरळमध्ये अडीच लाखांहून अधिक सक्रीय रुग्णसांख्या आहेत. 4 राज्यांमध्ये 61% पेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे. देशात 34 राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दरही सातत्याने कमी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडु, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या घटती आहे. 160 जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर हा 5 ते 10% इतका आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2022 08:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

