Karnataka: पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेता सीके रविचंद्रन यांच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन (Watch Video)

बेंगळुरू येथे एका कर्नाटक मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक संघटनेचे सदस्य तसेच कॉंग्रेस नेता सीके रविचंद्रन यांचा बेंगळुरूच्या प्रेम क्लबमध्ये पत्रकरा परिषद सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ck ravichandan PC TWITTER

Karnataka: बेंगळुरू येथे एका कर्नाटक मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक संघटनेचे सदस्य तसेच कॉंग्रेस नेता सीके रविचंद्रन यांचा बेंगळुरूच्या प्रेम क्लबमध्ये पत्रकरा परिषद सुरु असताना मृत्यू झाला. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- पिंपळाच्या पानांचा रस आहे आरोग्यासाठी फायदेशीर आहे; याने हृदय आणि फुफ्फुस राहिल स्वस्थ)

मिळालेल्या माहितीनुसार, रविचंदन पत्रकार परिषदेला संबोधित करत आहे. म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (MUDA) मध्ये सीएम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या मंजुरीच्या विरोधात त्यांचे मत मांडताना दिसले.  मात्र, बोलता बोलता ते काही वेळ थांबले आणि खुर्चीवरून खाली कोसळले. तेवढ्यात त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.

त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर प्रेस क्लबमध्ये गोंधळ निर्माण झाला. सीके रविचंद्रन यांच्या मृताची माहिती कुटुंबियांना देण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement