Communal Violence in Odisha: ओडिशामध्ये प्राण्यांच्या कत्तलीवरून हिंसाचार; बालासोरमध्ये शाळा बंद, कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्याकडून शांततेचे आवाहन (Watch Video)

प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्री तेथे हिसांचार पहायला मिळाला.

Photo Credit- X

Communal Violence in Odisha: ओडिशातील बालासोर शहर परिसरात हिंसाचाराच्या घटनेनंतर कर्फ्यू लागू करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 या चार तासांची सूट दिली आहे. प्राण्यांच्या कत्तलीवरून झालेल्या वादानंतर उत्तर ओडिशामधील शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला. त्याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी एक्सवर करत दिली. खबरदारीचे उपाय म्हणून, शाळा, अंगणवाडी केंद्र आणि महाविद्यालये 21 जून पर्यंत बंद राहतील, असे एका अधिसूचनेत म्हटले आहे. बँक आणि काही सरकारी कार्यालये वगळून 20 जूनच्या सकाळी 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोस्ट पाहा- 

मिळालेल्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 45 जणांना आतापर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मंगळवारी 34 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले होते, तर बुधवारी आणखी 10 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले, असे सरकारी वकील प्रणव पांडा यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला बालासोर शहरातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यास सांगितले.