Suicide | (Photo Credits: Pixabay)

बिहारमधील (Bihar) एका विद्यार्थ्याला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी सोहाना पोलिसांनी (Sohana Police) अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित राज सिंह हा लांडरान (Landran) येथील एका खाजगी महाविद्यालयात शिकत होता आणि तेथील वसतिगृहात राहत होता, तिथेच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आपल्या मुलाने हे टोकाचे पाऊल उचलण्यास वसतिगृहातील वॉर्डन जबाबदार असल्याचा आरोप पीडितेचे वडील संतोष कुमार यांनी केला आहे. हेही वाचा Begum Bazaar Honour Killing: हैदराबादमध्ये पुन्हा ऑनर किलिंगचे प्रकरण; आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाची निर्घृण हत्या

संतोष सिंगच्या तक्रारीवरून सोहाना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त) अन्वये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.