Medak Road Accident: कॉलेज बसची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू तर 20 विद्यार्थी जखमी
या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही बसची समोरासमोर धडक लागल्याने हा अपघात घडला आहे. हा अपघात शहराच्या क्लासिक गार्डनजवळ घडला आहे.
Medak Road Accident: तेलंगणातील (Telangana) मेडक (Medak) जिल्ह्यातील नरसापूरजवळ शुक्रवारी महाविद्यालयच्या दोन बसेसचा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही बसची समोरासमोर धडक लागल्याने हा अपघात घडला आहे. हा अपघात शहराच्या क्लासिक गार्डनजवळ घडला आहे. (हेही वाचा- चालत्या बस मध्ये सासू-सासर्याने गळा आवळून जावयाला संपवलं; CCTV फूटेज मधून झाला उलगडा)
मिळालेल्या माहितीनुसार, बीव्ही राजू इन्स्टीट्यू ऑफ टेक्नॉलॉजीच्या बसेसचा अपघात झाला. हा अपघात नरसापूर येथील क्लासिक गार्डनजवळ घडला. दोन्ही बसची समोरासमोर धडक लागल्याने हा अपघात घडला. अपघातात दोन्ही बस चालक गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही चालकांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढले.
दोन्ही चालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या चालकापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागराजू असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तो पाटनचेरू येथील रहिवासी होता. यादगिरी या दुसऱ्या बस चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन्ही बसमध्ये २० विद्यार्थी होते. अपघातात विद्यार्थी जखमी झाले. रक्तस्त्राव झालेल्या विद्यार्थ्यांना नरसापूर, संगारेड्डी आणि हैद्राबाद येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल केले.
अपघाताचा फोटो
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन्ही बस एकमेकांसमोर धडकल्या. अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले. अपघातामुळे नरसापूर या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.