Jammu-Kashmir Cloudburst: जम्मू-काश्मीरला पावसाचा जोरदार तडाखा, ढगफुटीमुळे 30 पेक्षा जास्त लोक बेपत्ता
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड़ (Kishtwar) गावात ढग फुटला आहे. जिल्ह्यातील दुर्गम गावात बुधवारी पहाटे झालेल्या ढगफुटीच्या घटनेत 30 हून अधिक लोक बेपत्ता (People disappeared) झाले.
मागील काही आठवडे महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार पावसाच्या (Rain) तडाख्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) जोरदार पाऊस सुरू आहे. मागील काही दिवसांपासूम जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सतत पाऊस पडत असल्याने ढगफुटी (Cloudburst) निर्माण झाली आहे. दरम्यान जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड़ (Kishtwar) गावात ढग फुटला आहे. जिल्ह्यातील दुर्गम गावात बुधवारी पहाटे झालेल्या ढगफुटीच्या घटनेत 30 हून अधिक लोक बेपत्ता (People disappeared) झाले आहेत. सुमारे 8-9 घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेत आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. एसडीआरएफ (SDRF)आणि सैन्याच्या (Military) मदतीने बचावकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे हे नेटवर्क ठप्प पडले आहे.
जुलैच्या अखेरीस जम्मूमध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे किश्तवारच्या अधिकाऱ्यांनी जलाशयांच्या जवळ राहणाऱ्या आणि निसरड्या भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मंगळवारी रात्री जारी केलेल्या सल्लागारात जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे की, "हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, ज्यामुळे नद्या व नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढू शकेल आणि जवळपास राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होईल. त्यामुळे निश्चित स्थळी सुखरूप रहावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे .
आजकाल देशातील बर्याच राज्यात पावसाचा कहर सुरू आहे. दिल्ली-एनसीआर आणि पश्चिम हिमालयीन राज्यांसह उत्तर-पश्चिम भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने या भागात आणखी एक दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात बुधवारपर्यंत मुसळधार ते जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथे पावसाचे प्रमाण कमी होईल. असे सांगितले आहे. दरम्यान पावसामुळे महाराष्ट्रात अतोनात नुकसान झाले आहे. अनेक लोकांचे बळी गेले आहे. पावसामुळे अनेक नैसर्गिक घटना घडून हानी झाली आहे. यावर्षी पावसामुळे खुप नुकसान झाल्याचे चित्रसगळीकडे पहायला मिळत आहे.