Jammu-Kashmir Cloudburst: जम्मू -काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात ढगफुटी, घटनेत एकाचा मृत्यू, अद्याप काही जण बेपत्ता
या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Dead) झाला आहे. तर इतर ढगफुटीमुळे उद्भवलेल्या फ्लॅश फ्लडमध्ये बेपत्ता झाले आहेत.
जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir) बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील काफरनर बहाक परिसरात ढगफुटी (Cloudburst) झाल्याची माहिती आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Dead) झाला आहे. तर इतर ढगफुटीमुळे उद्भवलेल्या फ्लॅश फ्लडमध्ये बेपत्ता झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ढगफुटीमुळे अचानक पूर काफरनारपर्यंत (Kafarnar) आला. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ते म्हणाले की राजौरीच्या हाजी बशीर बकरवाल नावाच्या कुटुंबातील सदस्याचा मृतदेह सापडला आहे. तर इतरांचा शोध लागला नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोधमोहीम सुरू आहे आणि हा परिसर अतिशय दुर्गम आहे. त्यामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीही कमकुवत आहे. दरम्यान अन्य एका घटनेत कुलगाम पोलिसांनी (Kulgam Police) सांगितले की, त्यांनी याथूर नाल्यातून एका कुटुंबातील पाच सदस्यांची सुटका केली आहे. कारण ते या भागात कालपासून मुसळधार पावसामुळे अडकले होते.
त्याचवेळी पोलिस प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, कुलगाम पोलिसांना आज सकाळी 6 च्या सुमारास माहिती मिळाली की 11-12 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या संततधार पावसामुळे नाला याथूर येथील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे आणि कुटुंब त्यांची जनावरे घेऊन जात होते. यासह ते नाल्याच्या मध्यभागी अडकले होते. सर्वांची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.