CISCE ICSE ISC Board Result 2025 Out: ICSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर; results.cisce.org वेबसाईटवर एका क्लिकवर पहा निकाल
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर झाला आहे.
CISCE ICSE ISC Board Result 2025 Out: दहावी, बारावीच्या परीक्षा निकाला संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदने (CISCE) 30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता ICSE (इयत्ता 10वी) आणि ISC (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. एका अधिकृत निवेदनातून ही माहिती समोर आली असून निकाल बोर्डाच्या मुख्यालयातून एकत्रितपणे जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल cisce.org या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकणार आहे.
शैक्षणिक वर्ष संपत असताना, भारतातील लाखो विद्यार्थी 2025 च्या बोर्ड परीक्षेच्या निकालांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच बोर्डाच्या मुख्यालयातून होणाऱ्या घोषणेनंतर, विद्यार्थी त्यांचा युनिक आयडी (Unique ID)आणि इंडेक्स (Index) एंटर करून अधिकृत वेबसाइट cisce.org - वरून त्यांच्या गुणपत्रिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात.
गेल्या वर्षी आयसीएसईचा निकाल 99.47% आणि आयएससीचा निकाल 98.19% होता. यावर्षीही चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
निकाल कसा पहाल?
CISCE ची अधिकृत वेबसाइट www.cisce.org किंवा www.results.cisce.org ला भेट द्या.
होमपेजवर "ICSE board exams results 2025" किंवा "ISC board exams results 2025" वर क्लिक करा.
कोर्स कोड (ICSE/ISC), युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि जन्मतारीख यासारखे तपशील प्रविष्ट करा.
'सबमिट' बटणवर क्लिक करा, त्यानंतर मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
मार्कशीट डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
एसएमएसद्वारे निकाल कसा पहाल:
विद्यार्थी एसएमएसद्वारे आयसीएसई आणि आयएससीचे निकाल देखील पाहू शकतात. यासाठी, खालील प्रक्रिया फॉलो करा:
तुमच्या मोबाईलवरून एक नवीन मेसेज उघडा.
तुमचा सात-अंकी युनिक आयडी टाइप करा आणि त्यानंतर ICSE किंवा ISC (लागू असल्यास) टाइप करा. उदाहरण: ICSE 1234567
हा मेसेज 09248082883 वर पाठवा.
निकाल लवकरच मजकूर संदेशाच्या स्वरूपात प्राप्त होईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)