Chhattisgarh Shocker: आई म्हणावी की वैरीण! तीन वर्षांच्या पोटच्या गोळ्याला जंगलात सोडून दिले; तहान आणि उपासमारीने चिमुकलीचा मृत्यू

उत्तर छत्तीसगडमधील लोर्मी भागातील जंगलात चार दिवसांच्या शोध मोहीमेनंतर चिमुकलीचा मृतदेह पोलिसांना सापडला.

Photo Credit- X

Chhattisgarh Shocker: छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने जंगलात सोडून दिल्याने तीन वर्षांच्या मुलीचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. उत्तर छत्तीसगडमधील लोर्मी भागातील जंगलात चार दिवसांच्या शोधानंतर या चिमुकलीचा मृतदेह सापडला.

टाईम्स ऑफ इंडीयाने दिलेल्या वृत्तानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी धिराही यांनी सांगितले की, मुलीचा मृत्यू तहान आणि उपासमारीने झाल्याचे दिसते. मृतदेह कुजलेला होता, मृतदेहावर प्राण्यांच्या हल्ल्याची चिन्हे नव्हती. धीराही यांच्या मते हे संभाव्य हत्येचे प्रकरण आहे. पोलीस सध्या मुलीची आई, संगिता पांडराम, गावाच्या सरपंचाची चौकशी करत आहेत.

विशेष म्हणजे चिमुकलीच्या मृत्यूनंतरही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती शिवराम याच्याशी झालेल्या भांडणानंतर संगीता ही 6 मे रोजी तिच्या मुलीसह घरातून निघून गेली होती. तिने असा दावा केला की ती तिच्या पालकांच्या ठिकाणी 25 किमी अंतरावर, मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात जात होती. त्या दरम्यान, तिने लहान मुलीला अचनकमार व्याघ्र प्रकल्पात सोडले होते.

संगिता त्याच रात्री घरी परतली पण फक्त तिची मोठी मुलगी अनुष्कासोबत ती होती. तिच्या नवऱ्याने आणि गावकऱ्यांनी चिमुरडीबद्दल विचारले असता, तिने तिला अचनाकमार जंगलातील मैलू टेकड्यांजवळ सोडल्याचे सांगितले ती तिला आणायला विसरली. शिवराम आणि काही गावकऱ्यांनी त्या चिमुकलीचा शोध घेतला, परंतु त्यांना ती सापडली नाही.

अधिक विचारले असतान संगीताने सांगितले की, मुलीला झाडाखाली झोपलेली सोडून पाण्याच्या शोधात ती गेली होती, पण परत जाताना ती हरवली. तिची शोधाशोध केली मात्र, मुलगी कुठेच सापडली नाही.