Chennai: उशीर झाल्यामुळे ग्राहकाकडून शिवीगाळ फूड डिलिव्हरी बॉयची आत्महत्या

पवित्रन असे मृत तरुणाचे नाव असून तो बीकॉमचा विद्यार्थी होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बुधवारी पवित्रन त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला आणि त्याच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली. यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी ग्राहकाच्या अपमानास्पद वागणुकीला जबाबदार धरले.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Chennai: चेन्नईत एका 19 वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयने एका ग्राहकाने कथितपणे शिवीगाळ केल्यामुळे आत्महत्या केली. पवित्रन असे मृत तरुणाचे नाव असून तो बीकॉमचा विद्यार्थी होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बुधवारी पवित्रन त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला आणि त्याच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली. यामध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी ग्राहकाच्या अपमानास्पद वागणुकीला जबाबदार धरले. या चिठ्ठीत आपली व्यथा व्यक्त करताना पवित्रनने सांगितले की, अन्न वितरणादरम्यान एका महिला ग्राहकाने शिवीगाळ केल्याने तो डिप्रेशनमध्ये गेला होता. जोपर्यंत अशा महिला राहतील तोपर्यंत आणखी मृत्यू होत राहतील. मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर रोजी कोरात्तूर भागात अन्न डिलिव्हरी करताना पवित्रनला ग्राहकाचे घर शोधण्यास उशीर झाल्याची घटना घडली. उशीर झाल्यामुळे त्यांना ग्राहकाच्या रागाला  सामोरे जावे लागले आणि नंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हे देखील वाचा: Nagpur Solar Project: महाराष्ट्रातील 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप

घटनेच्या दोन दिवसांनंतर, पवित्राने कथितरित्या ग्राहकाच्या घरावर दगडफेक केली आणि त्याची खिडकी तोडली. त्यामुळे ग्राहकाने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. बुधवारी पवित्रन हा त्याच्या घराच्या टेरेसला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच कोलाथूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी किलपॉक  या शासकीय रुग्णालयात पाठवला. पवित्राने लिहिलेली सुसाईड नोटही घरातून जप्त करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.