Mobile Ban on Char Dham Yatra: चार धाम मंदिराच्या परिसरात मोबाईलवर बंदी, नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर होणार कारवाई
१० मे रोजी पासून ही यात्रा सुरु झाली असून सर्व राज्यातून मोठ्या उत्साहाने भाविक यात्रेसाठी सहभागी होत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडाच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी भाविकांना चारही धामांमधील मंदिर परिसराच्या 50 मीटरच्या परिघात सोशल मीडियासाठी व्हिडिओग्राफी/रील्स बनवण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत, त्यांनी हे आदेश सचिव पर्यटन, गढवाल विभागाचे आयुक्त आणि संबंधित जिल्ह्यांचे डीएम आणि एसपी यांना दिले आहेत. चार धाम यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यात पण अनेक लोक परिसरात फोटो शुट आणि रिल्स शुट साठी येत असतात. त्यामुळे गर्दीमुळे इतर भाविकांची गैरसोय होत असते. भाविकांच्या श्रध्देला तडा जाऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने हे नियम जारी केले आहे.
नियमांचे उल्लघंन केल्यास कारवाई
कोणत्याही भाविकाने नोंदणी नसलेल्या वाहनाने किंवा नोंदणी नसलेल्या पध्दतीने येऊ नये. केदारनाथ मंदिरात यात्रेसाठी येण्यापूर्वी प्रत्येकाने पूर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. आणि मुख्य म्हणजे कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या अशी माहिती मुख्य सचिव यांनी दिली.