Delhi Coaching Centre Deaths: दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेचा तपास सीबीआय करणार; पोलिसांडून सर्व कागदपत्रे सीबीआयकडे सुपूर्द
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने बुधवारी दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरणाचा ताबा घेतला आहे. सीबीआयने प्रकरणात एफआयआर नोंदवून हे प्रकरण ताब्यात घेतले आहे. तपासाबाबतची सर्व कागदपत्रे दिल्ली पोलिसांनी सीबीआयकडे सोपवली आहेत.
Delhi Coaching Centre Deaths: केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI)बुधवारी दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यू प्रकरणाचा ताबा घेतला आहे. ओल्ड राजिंदर नगरमधील राऊज आयएएस कोचिंग सेंटर(Rau's IAS Coaching Centre)च्या तळघरात असलेल्या लायब्ररीत पाणी साचल्याने तीन UPSC उमेदवार बुडून मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासावर न्यायालय असमाधानी असल्याचे मनूद करत 2 ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे वर्ग केला. 'प्रारंभिक औपचारिकतेनंतर, सीबीआयची टीम लवकरच या प्रकरणाच्या तपशीलवार तपासासाठी घटनास्थळी भेट देणार आहे,' असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा:Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेप्रकरणी SUV चालक Manuj Kathuria ला जामीन मंजूर )
याआधी बुधवारी, कोर्टाने राऊज आयएएस कोचिंग सेंटरमध्ये तळघराच्या चार सह-मालकांच्या जामीन याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर सीबीआयला नोटीस बजावली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अनुज बजाज चंदना यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केस हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर सीबीआयला नोटीस बजावली आणि सीबीआयकडून अहवाल मागवला. (हेही वाचा:Delhi IAS Coaching Centre Tragedy: Vikas Divyakirti यांच्याकडून दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर )
27 जुलै रोजी राजिंदर नगर पोलिस स्टेशन येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आरोपींवर भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 105,106(1), 115(2), 290, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 28 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 5 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोचिंग सेंटर्समधील सुरक्षेच्या नियमांशी संबंधित मुद्द्यावर स्वत:हून दखल घेतली. कोचिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत असताना अशा संस्था ‘डेथ चेंबर’ बनल्या आहेत, असे निरीक्षण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नोंदवले.
कोर्टाने म्हटले आहे की अलीकडील दुर्दैवी घटना काही तरुण इच्छुकांचा जीव घेणाऱ्या आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरसाठी कोचिंग सेंटर्समध्ये प्रवेश केला आहे आणि सर्वांसाठी डोळे उघडले आहेत. न्यायालयाने पुढे असे सुचवले की अशा संस्थांनी दिल्लीच्या युनिफाइड बिल्डिंग उपविधी, 2016 सह वाचलेल्या दिल्लीच्या मास्टर प्लॅन, 2021 अंतर्गत अग्नि आणि सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करेपर्यंत ऑनलाइन क्लासेसद्वारे कार्य करावे. (ANI)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)