Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये गुरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 57 जनावरांची पोलिसांकडून सुटका

गुरांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 57 जनावरांची तस्करी करण्यात येत होती. पोलिसांकडून त्या सर्व जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

Cattle | Representational Image | (Photo Credits: PTI)

Tamil Nadu: तामिळनाडू पोलिसांनी प्राणी कल्याण स्वयंसेवकांच्या मदतीने गुरांच्या तस्करीचा (Cattle Smuggling Gang)पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 57 प्राण्यांची सुटका केली. प्राणी कल्याण स्वयंसेवकांच्या मदतीने प्राण्यांची वाहतूक होणारे वाहन पोलिसांनी अडवले. चेंगलपट्टू येथे ही घटना उघडकीस आली. प्राणी कल्याण कार्यकर्ते साई विघ्नेश यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता तपासनी दरम्यान जनावरांचा आवाज येऊ नये म्हणून जनावरे रश्सीने बांधणयात आली होती. त्यांना झोप येऊ नये म्हणून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्यात आली होती. (हेही वाचा:Chhattisgarh: गाय तस्करीच्या संशयावरून गुरे घेऊन जाणाऱ्या दोन तरुणांची हत्या; रायपूरमधील घटना )

प्रकरणी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह जनावरांच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांप्रती क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्राण्यांची सुटका करण्यात आली असून त्यांना उपचारासाठी तिरुवल्लूर येथील ऑलमाईटी ॲनिमल केअर ट्रस्ट अभयारण्यात पाठवण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif