CAPF डॉक्टरांनी 60 अनफिट तरुणांना दिलं वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं सर्टिफिकेट; MHA ने दिले चौकशीचे आदेश
या घटनेमुळे सीआरपीएफसह अनेक दलांचे डॉक्टर रडारवर आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश जारी केले आहेत. अमर उजाला प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण कॉन्स्टेबल जीडी भर्ती 2018 शी संबंधित आहे.
CAPF Medical Testing Scam: केंद्रीय निमलष्करी दलातील कॉन्स्टेबल (CAPF) पदासाठीच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. CAPF डॉक्टरांनी (CAPF Doctors) वैद्यकीय तपासणीत 60 अनफिट उमेदवारांना तंदुरुस्त (Medically Fit) असल्याचं घोषित केलं आहे. रुजू होताना केलेल्या मेडिकल तपासणीत ही बाब उघडकीस आली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास करण्यात आला. सीएपीएफच्या एडीजी मेडिकलला हे प्रकरण खरे असल्याचे आढळले. त्यांनी आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला.
या घटनेमुळे सीआरपीएफसह अनेक दलांचे डॉक्टर रडारवर आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश जारी केले आहेत. अमर उजाला प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण कॉन्स्टेबल जीडी भर्ती 2018 शी संबंधित आहे. या भरतीमध्ये, वैद्यकीय कारणास्तव अपात्र असलेले 60 उमेदवार होते. परंतु, त्यांना परीक्षेत तंदुरुस्त दाखवण्यात आले होते. (हेही वाचा -Unemployment Rate Decline In India: भारतातील बेरोजगारीच्या संख्येत लक्षणीय घट, सरकारी आकडेवारीतून दावा)
दरम्यान, यापैकी 17 तरुणांवर सीआरपीएफच्या डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले. विशेष बाब म्हणजे 17 उमेदवारांपैकी 7 जणांची सीआरपीएफसाठी निवड झाली. उर्वरित उमेदवारांना इतर दलांचे वाटप करण्यात आले. ही वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने, सीआरपीएफचे 16 वैद्यकीय अधिकारी/सीएमओ कर्तव्यावर होते. वैद्यकीय तपासणीत त्यांनी फिट घोषित केलेले उमेदवार रुजू होताना अपात्र आढळले. हे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी/सीएमओ, सीआरपीएफचे ग्रुप सेंटर 'जीसी' पुणे आणि नागपूरसह इतर अनेक ग्रुप सेंटरमध्ये कार्यरत होते. (वाचा -UPSC Results Declared See Toppers List: केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारा आयोजित नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर, कसा डाऊनलोड कराल? जाणून घ्या टॉप 10 उमेदवार)
पुण्यातील एसएमओ जीसी डॉ. सुशील कुमार यांनी युवराज गोकुळची वैद्यकीय चाचणी केली होती. 8 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या सविस्तर वैद्यकीय तपासणीत (DME) तो तंदुरुस्त असल्याचे दिसून आले. मार्च 2021 मध्ये रुजू होताना पुन्हा मेडिकल केले असता युवराज गोकुळ हे अनफिट आढळले. सीआरपीएफ जीसी नागपूर येथे ही वैद्यकीय प्रक्रिया पार पडली. या तरुणाला 'स्कोलिओसिस ऑफ द थोरॅसिक स्पाइन' हा आजार होता. असे असतानाही 'तपशीलवार वैद्यकीय तपासणी'मध्ये त्याला अपात्र घोषित करण्यात आले नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)