BSE Sensex Update: मुंबई शेअर बाजार सावरायला सुरूवात;व्यवहाराच्या सुरूवातीला सेन्सेक्स, निफ्टी मध्ये उसळी

सकाळी बाजार उघडताच सुरूवातीच्य व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 522.68 अंकांनी वधारून 31,101.77 वर होता तर निफ्टी देखील 150.45 अंकांनी वधारून 9,117.50 वर पोहचला होता.

Sensex | Photo Credits: File Photo

 BSE Sensex Today:  कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे मागील अनेक दिवसांपासून मुंबई शेअर बाजारात कोसळणारा सेन्सेक्स आणि निफ्टी आता पुन्हा सावरायला सुरूवात झाली आहे. सकाळी 9.15 च्या सुमारास मुंबई शेअर बाजार उघडते. त्यानुसार आज (18 मार्च) मुंबई शेअर बाजार उघताच गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक चित्र होतं. सकाळी बाजार उघडताच सुरूवातीच्य व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 522.68 अंकांनी वधारून 31,101.77 वर होता तर निफ्टी देखील 150.45 अंकांनी वधारून 9,117.50 वर पोहचला होता. दरम्यान मागील आठवड्याभरात 3000 अंकांहूनही अधिक सेनेक्स अवघ्या एका दिवसाभरातच कोसळल्याने कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले होते. मात्र कालपासून हळूहळू बाजार पुन्हा सावरायला सुरूवात झाली आहे. मुंबई शेअर बाजार कोसळत असल्याने सोन्याच्या किंमतींवरही त्याचा परिणाम पहायला मिळाला आहे.

मुंबई शेअर बाजार कोसळण्यामागे कोरोना व्हायरसचा वाढता धोका, येस बॅंकेवरील आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय बाजारात घसरणारे कच्च्या तेलाचे दर अशा अनेक गोष्टी होत्या. आजपासून येस बॅंकेवरील आर्थिक निर्बंध उठवल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर पहायला मिळाला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा फटका मुंबई शेअर बाजारासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय बाजारांसह आशियाई बाजरांनाही बसत आहे. Coronavirus मुळे भारताच्या विकास दरात होणार 'इतकी' घसरण; S & P Global कंपनीचा अंदाज

आज मुंबई शेअर बाजार उघडताच Yes Bank, Glenmark Pharma, Zee Entertainment, IndusInd Bank, Bharti Infratel, Sun Pharma, Vedanta, Tata Steel, JSW Steel, Titan यांचा मेजर गेनर्स मध्ये समावेश आहे. तर PVR, Kotak Mahindra Bank, Axis Bank यांचे शेअर्स गडगडल्याचं चित्र आहे.