Five IndiGo Flights Receive Bomb Threat: इंडिगोच्या 5 विमानांना बॉम्बची धमक्या; सहा दिवसांत 70 विमानांना आले बनावट कॉल

त्यापैकी एकट्या इंडिगोच्या पाच विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. याशिवाय विस्तारा आणि एअर इंडिया एक्स्प्रेसलाही धमकीचे फोन आले आहेत. डीजीसीएच्या सर्व कॉल्सवर सतत नजर ठेवली जात आहे.

Flights | (Photo Credit - X/ANI)

Five IndiGo Flights Receive Bomb Threat: विमानांना बॉम्बच्या खोट्या धमक्या (Bomb Threat) मिळण्याची प्रकरणे थांबायचे नाव घेत नाही. शनिवारी नऊ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यापैकी एकट्या इंडिगोच्या पाच विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या (Five IndiGo Flights Receive Bomb Threat) आल्या आहेत. याशिवाय विस्तारा (Vistara) आणि एअर इंडिया एक्स्प्रेसला (Air India Express) ही धमकीचे फोन आले आहेत. डीजीसीएच्या सर्व कॉल्सवर सतत नजर ठेवली जात आहे. सोमवारपासून आतापर्यंत 70 फ्लाइट्सना धमक्या आल्या आहेत.

बॉम्बच्या धमक्यानंतर इंडिगोने जारी केले निवेदन -

इंडिगोने जारी केलेल्या निवेदनानुसार, मुंबई ते इस्तंबूल या फ्लाइट 6E 17 शी संबंधित परिस्थितीची माहिती आहे. आमचे प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहोत आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहोत. त्याच वेळी, दिल्ली ते इस्तंबूल या फ्लाइट 6E 11 च्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. आमच्या प्रवासी आणि चालक दलाची सुरक्षा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (हेही वाचा -Air India Express च्या Dubai-Jaipur Flight ला बॉम्बची धमकी; जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)

जोधपूरहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइटचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग -

जोधपूर ते दिल्लीच्या फ्लाइटवर इंडिगोने सांगितले की, फ्लाइट 6E 184 ला सुरक्षेशी संबंधित अलर्ट मिळाला होता. विमान दिल्लीत उतरले असून सर्व प्रवासी विमानातून उतरले आहेत. आम्ही सुरक्षा यंत्रणांसोबत प्रक्रियेनुसार काम करत आहोत. इंडिगो व्यतिरिक्त 'विस्तारा' या विमान कंपनीच्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या, त्या नंतर खोट्या निघाल्या. खबरदारी म्हणून विमान फ्रँकफर्टकडे वळवण्यात आले. (हेही वाचा - Delhi: विस्ताराच्या दिल्ली-लंडन फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी, धमकीच्या घटना रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक लागू करणार कठोर नियम)

तथापी, विस्ताराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइट्सना शुक्रवारी सोशल मीडियावर धमकी मिळाली. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब सतर्क करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीतून लंडन, पॅरिस आणि हाँगकाँगला जाणाऱ्या विस्तारा विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, ज्या नंतर खोट्या असल्याचे आढळून आले. प्रवक्त्याने सांगितले की, 'विस्तारा फ्लाइट क्रमांक 'UK17' दिल्ली ते लंडनला खबरदारीचा उपाय म्हणून फ्रँकफर्टच्या दिशेने वळवण्यात आले.'