Varanasi: माण मंदिर घाटाजवळ झालेल्या या धडकेत बोट पलटी, बोटीवर होते 60 लोक
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये शुक्रवारी लोकांनी भरलेली बोट गंगा नदीत बुडाल्याची भीषण घटना घडली. बोटीवर सुमारे 60 जण होते, अशी माहिती समोर आली आहे. वाराणसीतील मान मंदिर घाटाच्या पलीकडे गंगेजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील सर्व प्रवासी ओडिशाचे रहिवासी आहेत. गंगा नदी पाहण्यासाठी ते बोटीवर होते. तेवढ्यात एका मोठ्या बोटीची एका छोट्या बोटीशी धडक झाली.
Varanasi: उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये शुक्रवारी लोकांनी भरलेली बोट गंगा नदीत बुडाल्याची भीषण घटना घडली. बोटीवर सुमारे 60 जण होते, अशी माहिती समोर आली आहे. वाराणसीतील मान मंदिर घाटाच्या पलीकडे गंगेजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील सर्व प्रवासी ओडिशाचे रहिवासी आहेत. गंगा नदी पाहण्यासाठी ते बोटीवर होते. तेवढ्यात एका मोठ्या बोटीची एका छोट्या बोटीशी धडक झाली. दिलासादायक बाब म्हणजे बोटीवरील सर्व लोकांनी लाईफ जॅकेट परिधान केले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व लोकांना वाचवले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवर 60 लोक होते, हे सर्व जण ओडिशाचे रहिवासी आहेत. एनडीआरएफ आणि पाणी पोलिसांनी सर्वांना वाचवले असून एक जण जखमी झाला असून त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. आणखी एका प्रत्यक्षदर्शीनेही बोटीवर ६० जण असल्याची पुष्टी केली. तेवढ्यात एका मोठ्या बोटीने छोट्या बोटीला धडक दिल्याने हा अपघात झाला. सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे.