Explosion in Baramulla District: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात स्फोट; 4 जणांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील शेर कॉलनीमध्ये एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी काही लोक ट्रकमधून भंगार काढत होते.
Explosion in Baramulla District: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील बारामुल्ला जिल्ह्यातील (Baramulla District) सोपोर भागात (Sopore Area) झालेल्या स्फोटात (Explosion) चार जणांचा मृत्यू झाला आहे. शेर कॉलनीत भंगार विक्रेता ट्रकमधून माल उतरवत असताना ही घटना घडली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
घटनास्थळी लोकांची गर्दी झाली असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटात चार जणांना आपला प्राण गमवावा लागला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली असून हा स्फोट नेमकी कसा झाला याचा तपास करण्यात येत आहे. (हेही वाचा -Waluj Explosion At Petrol Pump: दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक फोन आला, पुढे जे घडले ते धक्कादायक)
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरातील शेर कॉलनीमध्ये एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी काही लोक ट्रकमधून भंगार काढत होते. (हेही वाचा - Explosion In Gurugram Factory: हरियाणातील गुरुग्राम येथील फायरबॉल बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी)
या घटनेत दोन जण जागीच मरण पावले, तर दुसऱ्या दोन जणांचा नंतर मृत्यू झाला. नझीर अहमद नाद्रू (40), अझीम अश्रफ मीर (20), आदिल रशीद भट (23) आणि मोहम्मद अझहर (25) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील सर्वजण शेर कॉलनीतील रहिवासी होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)