Bihar Road Accident: बिहारमध्ये कार-ऑटो रिक्षाच्या धडकेत 5 ठार, 8 जण जखमी

पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेगुसराय शहरातील एफसीआय पोलीस स्टेशन हद्दीतील रतन चौकाजवळ आज सकाळी कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाली.

Accident PC PIXABAY

Bihar Road Accident: बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात मंगळवारी कार आणि ऑटो-रिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत पाच जण ठार तर आठ जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेगुसराय शहरातील एफसीआय पोलीस स्टेशन हद्दीतील रतन चौकाजवळ आज सकाळी कार आणि रिक्षा  यांच्यात समोरासमोर धडक झाली. या घटनेवर शोक व्यक्त करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले. या अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यात रिक्षाचालकाचाही समावेश आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षा हथिदाह जंक्शन येथून बेगुसराय शहराकडे जात होती.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सिंटू कुमार (28), विकी कुमार (21), नितीश कुमार (24), अमनदीप कुमार (22) आणि रजनीश कुमार (25) अशी मृतांची नावे आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif