Bihar Election Results 2020 Times Now Live Streaming: टाइम्स नाऊवर पाहा बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल
बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणाला जनादेश दिला आहे, हे मंगळवारी कळेल. बिहार निवडणुक निकालाचे संपूर्ण कव्हरेजवर आपण टाइम्स नाऊ टीव्ही आणि ऑनलाईनवर लाईव्ह पाहू शकता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता राज्यातील 38 जिल्ह्यातील 55 केंद्रांवर प्रारंभ होईल.
Bihar Election Results 2020 Times Now Live Streaming: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) 243 जागांसाठी मंगळवारी मतमोजणी करण्यात येणार आहे. बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणाला जनादेश दिला आहे, हे मंगळवारी कळेल. सकाळी मतमोजणी सुरू होईल आणि संध्याकाळपर्यंत निर्णय होईल की बिहार पुन्हा नितीश कुमारांच्या (Nitish Kumar) ताब्यात जाईल किंवा 15 वर्षानंतर बिहारमध्ये 'बदल' होईल. यंदा बिहारमध्ये 58 टक्के मतदान झाले. तीन चरणांची बिहार विधानसभा निवडणूक 7 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली आणि आता आज, 10 नोव्हेंबर रोजी निकाल समोर येईल. एक्झीट पोल राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) महागठबंधन आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात कठोर लढा असल्याचे दर्शविले आहे. अशा स्थितीत, आजच्या मतमोजणीपूर्वी बिहारच्या राजकारणात शांतता दिसत आहे. ()
टाइम्स नाऊउवर बिहार निवडणूक निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. बिहार निवडणुक निकालाचे संपूर्ण कव्हरेजवर आपण टाइम्स नाऊ टीव्ही आणि ऑनलाईनवर लाईव्ह पाहू शकता. बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजता राज्यातील 38 जिल्ह्यातील 55 केंद्रांवर प्रारंभ होईल. एकीकडे, भारतीय निवडणूक आयोग (ईसीआय) सकाळी 8 वाजल्यापासून मतदारांचा ट्रेंड जाहीर करेल, तर संध्याकाळपर्यंत विजेत्यांचे चित्रही स्पष्ट होईल. बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. मागील निवडणुकीपासून राज्यातील राजकीय परिस्थितीही बदलली आहे. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांना 178 जागा मिळाल्या होत्या.
दरम्यान, यंदाच्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वातील महाआघाडीची एनडीएवर आघाडी दाखवली आहे. त्यामुळे, एक्सिट पोलच्या अनुषंगाने निकाल लागला असता तर नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत 31 वर्षीय तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात.