Jammu Kashmir Update: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या बाहेरील हरवानमध्ये (Harwan) लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमध्ये (Srinagar) दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या बाहेरील हरवानमध्ये (Harwan) लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी एका ट्विटमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख सलीम परे म्हणून केली असून तो लष्कर-ए-तैयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित होता. या ट्विटमध्ये आणखी एका परदेशी दहशतवाद्याचाही खात्मा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, नंतर सलीमचीच हत्या झाल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तानी दहशतवादी हाफिज पळून जाण्यात यशस्वी झाला असला तरी त्याला पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू आहे. याच मोहिमे दरम्यान हाफिजचाही मृत्यू झाला होता. पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, हाफिज उर्फ हमजाचा बांदीपोरा येथे दोन पोलिसांच्या हत्येसह इतर दहशतवादी घटनांमध्ये सहभाग आहे. हरवाननंतर श्रीनगरच्या गौसामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. हेही वाचा Covid Scare on Cordelia Crusie Ship: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ शिपवर तब्बल 66 प्रवाशांना कोरोनाची लागण
घटनास्थळावरून दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सातत्याने ऑपरेशन सुरू आहे. 31 डिसेंबरलाही श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले होते. यापूर्वी 30 डिसेंबर रोजी दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या दोन चकमकीत दोन पाकिस्तानी नागरिकांसह सहा दहशतवादी मारले गेले होते.