Beating The Retreat Ceremony: दिल्लीतील विजय चौकात 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्याला सुरुवात; राष्ट्रपती मुर्मू आणि पंतप्रधान मोदींची उपस्थिती, See Videos

दरवर्षी 29 जानेवारीच्या संध्याकाळी होणारे हे बीटिंग रिट्रीट, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या समाप्तीस चिन्हांकित करते.

Beating The Retreat Ceremony (PC - ANI)

Beating The Retreat Ceremony: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीतील विजय चौकातील 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'बीटिंग द रिट्रीट' समारंभात लष्कराच्या तिन्ही शाखा आणि राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मधील संगीत बँडद्वारे 29 ट्यून वाजवले जातील. राष्ट्रीय राजधानीतील विजय चौकात 'बीटिंग द रिट्रीट' समारंभात लष्करी बँडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

'बीटिंग द रिट्रीट' सोहळा हा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरवर्षी 29 जानेवारीच्या संध्याकाळी होणारे हे बीटिंग रिट्रीट, प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या समाप्तीस चिन्हांकित करते. या खास प्रसंगी खास धून वाजवून तिन्ही सेना राष्ट्रपतींकडून त्यांच्या बॅरेकमध्ये परतण्यासाठी अधिकृत परवानगी घेतात.

पहा व्हिडिओज -