Bank Holidays in September: सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार; वाचा संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी

प्रादेशिक सुट्ट्या राज्य सरकार ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात एकूण किती दिवस सुट्ट्या असतील ते जाणून घेऊयात.

Bank Holidays | Image used for representational purpose (Photo Credit: PTI)

Bank Holidays in September: ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. यानंतर सप्टेंबर महिना सुरू होईल. पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये अनेक सण साजरे केले जात आहेत. अशा परिस्थितीत बँकांना बंपर सुट्ट्या असणार आहेत. बँकेला सुट्टी असल्याने ग्राहकांच्या बँकांशी संबंधित कामावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर ते लवकरात करा. कारण, पुढील महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्टी असणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार, बँका सर्व सार्वजनिक सुट्ट्यांवर आणि विशिष्ट राज्यावर अवलंबून काही प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी बंद राहतील. प्रादेशिक सुट्ट्या राज्य सरकार ठरवतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुट्ट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात एकूण किती दिवस सुट्ट्या असतील. यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. वास्तविक सप्टेंबर महिन्यात 4 रविवार असतात. यासोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते, म्हणजेच संपूर्ण देशात या 6 सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा - How to Save Money: पैशांची बचत कशी करावी? जाणून घ्या टिप्स)

सप्टेंबर 2023 बँक सुट्टयांची यादी -

6 सप्टेंबर, बुधवार - श्री कृष्ण जन्माष्टमी

7 सप्टेंबर, गुरुवार - जन्माष्टमी (श्रावण) / श्री कृष्ण अष्टमी

18 सप्टेंबर, सोमवार - वर्षसिद्धी विनायक व्रत / विनायक चतुर्थी

19 सप्टेंबर, मंगळवार - गणेश चतुर्थी / संवत्सरी (चतुर्थी पक्ष)

20 सप्टेंबर, बुधवार - गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) / नुआखाई

22 सप्टेंबर, शुक्रवार - श्रीनारायण गुरु समाधी दिन

23 सप्टेंबर, शनिवार - महाराजा हरिसिंह यांचा जन्मदिन

25 सप्टेंबर, सोमवार - श्रीमंत शंकरदेवांची जयंती

27 सप्टेंबर, बुधवार - मिलाद-ए-शरीफ (प्रेषित मुहम्मद यांचा जन्मदिवस)

28 सप्टेंबर, गुरुवार - ईद-ए-मिलाद / ईद-ए-मिलादुन्नबी - (प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस) (बारा वफत)

29 सप्टेंबर, शुक्रवार - ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतर इंद्रजात्रा

बँक बंद असूनही ग्राहक अनेक प्रकारची कामे डिजिटल पद्धतीने हाताळू शकतात. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे काम डिजिटल पद्धतीनेही करू शकता.