Bank strike in 2019: नववर्षात बँक कर्मचारी पुन्हा संपावर; 8,9 जानेवारीला बँक व्यवहार ठप्प!

त्यामुळे जानेवारी 2019 च्या 8-9 तारखेला बँक व्यवहार ठप्प होणार आहेत.

Employees Strike | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

येत्या नव वर्षात पुन्हा बँक कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2019 च्या 8-9 तारखेला बँक व्यवहार ठप्प होणार आहेत.

सरकारने काही दिवसांपूर्वीच विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँक (Dena Bank) या बँकांचे बँक ऑफ बडोदा ( Bank of Baroda) या बँकेत विलिनीकरण केले. सरकारच्या या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी संघटनेने हा संप पुकारला होता. मात्र पुन्हा एकदा नवीन वर्षात बँक कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात येणार आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोशियेशन (AIBE) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया सुद्धा या संपामध्ये सहभागी होणार आहेत. तर बँकींग क्षेत्रातील काही कारणास्तव हा संप पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जर डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट, फिक्स डिपॉझिट यासारखी बँकेची काम करवयाची असल्यास त्यांना ती संप संपल्यावर करता येणार आहेत. बँकेने संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. परंतु हा संप एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी असणार आहे.मात्र पुन्हा युनायडेट बँक 20 दिवसाच्या आतमध्ये तिसऱ्या वेळी संप पुकारण्याचा इशारा देणार आहेत. (हेही वाचा-Nation-wide Bank Strike: बँका आज बंद! तब्बल 10 लाख कर्मचारी संपावर)

तर 21 डिसेंबर रोजी विविध राज्यातील जवळजवळ 3.20 लाख अधिकारी बँकेचे कार्य पाहत होते. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे विलिनीकरण, कर्मचारी वेतनवाढ तसेच, इतर अनेक मागण्या आणि मुद्द्यांवरुन बँक कर्मचाऱ्यांनी (Bank Employees ) संप पुकारला होता.