Baby Boy Born with 25 Fingers in Karnataka: कर्नाटकात जन्माला आले हाताला 13...पायाला 12 बोटं असणारे बाळ
प्राप्त माहितीनुसार, मुलाच्या दोन्ही पायात एकूण 12 बोटे आहेत, तर दोन्ही हातांना मिळून 13 बोटे आहेत. मुलाच्या उजव्या हाताला 6 आणि डाव्या हाताला 7 बोटे आहेत. दोन्ही पायांना 6-6 बोटे आहेत. ही दुर्मिळ घटना पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.
Baby Boy Born with 25 Fingers in Karnataka: कर्नाटकातील (Karnataka) बागलकोट जिल्ह्यात (Bagalkot District) 25 बोटे असलेल्या बालकाचा जन्म (Baby Boy Born with 25 Fingers) झाला आहे. या नवजात मुलाला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. मुलाच्या जन्मानंतर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घरातील सदस्य या मुलाला देवीचा आशीर्वाद असल्याचं म्हणत आहेत. मुलाच्या उजव्या हाताला 6 आणि डाव्या हाताला 7 बोटे आहेत. तसेच दोन्ही पायांना 6-6 बोटे आहेत. कुटुंबीयांनी मुलाला देवीचे वरदान असल्याचे म्हटलं आहे.
बनहट्टी तालुक्यातील सनशाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या बाळाचा जन्म झाला. मुलाच्या दोन्ही हात आणि पायाला एकूण 25 बोटे आहेत. साधारणत: मानवाला हात आणि पाय अशी एकत्रित 20 बोटे असतात. परंतु, नवजात बालकाच्या हात आणि पायाला एकून 25 बोटे असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. (हेही वाचा -Chennai Baby Rescue VIDEO: बाल्कनीच्या छतावर पडलेल्या बाळाला जीवदान, काळजाला भिडणारा व्हिडिओ व्हायरल)
प्राप्त माहितीनुसार, मुलाच्या दोन्ही पायात एकूण 12 बोटे आहेत, तर दोन्ही हातांना मिळून 13 बोटे आहेत. मुलाच्या उजव्या हाताला 6 आणि डाव्या हाताला 7 बोटे आहेत. दोन्ही पायांना 6-6 बोटे आहेत. ही दुर्मिळ घटना पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत. (हेही वाचा - Class 11 Girl Delivers Baby In College Toilet: कर्नाटकात अकरावीत शिकणाऱ्या मुलीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल)
डॉक्टरांच्या मते, ही एक दुर्मिळ घटना आहे आणि गुणसूत्रांमध्ये बदल झाल्यामुळे असे घडते. डॉक्टरांनी सांगितले की, चांगली गोष्ट म्हणजे या अनोख्या प्रसूतीनंतर बाळ आणि त्याची 35 वर्षीय आई भारती पूर्णपणे निरोगी आहेत. घरातील सदस्य याला देवीचा आशीर्वाद मानत आहेत. मुलाचे वडील गुरप्पा कोनूर यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्य ग्रामदेवी भुवनेश्वरी देवीचे भक्त आहेत. देवीच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या घरी एवढ्या दुर्मिळ बालकाचा जन्म झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या दुर्मिळ बालकाला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)