India-Australia Summit: ऑस्ट्रेलियाने भारताला परत केल्या 29 मौल्यवान कलाकृती; पंतप्रधान मोदींनी केली पाहणी, Watch Video

पीएम मोदी आणि स्कॉट मॉरिसन यांच्या भेटीत भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूक यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

India-Australia Summit: ऑस्ट्रेलियाने भारताला परत केल्या 29 मौल्यवान कलाकृती; पंतप्रधान मोदींनी केली पाहणी, Watch Video
Australia returns 29 valuable antiquities to India (PC - ANI)

India-Australia Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांच्यातील द्विपक्षीय शिखर परिषदेपूर्वी 29 मौल्यवान कलाकृती भारतात परत करण्यात आल्या आहेत. यासोबतचं पीएम मोदींनी या कलाकृतींचीही पाहणी केली आहे. यात पुरातन कलाकृती भगवान विष्णू आणि त्यांची रूपे, जैन परंपरा, चित्रे आणि सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाने 29 पुरातन वास्तू भारतात परत आणल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियातून परत आणलेल्या या पुरातन वास्तूंची पाहणी केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. असे म्हटलं जात आहे की, या पुरातन वास्तू इसवी सन 9-10 शतकातील वेगवेगळ्या कालावधीतील आहेत. (हेही वाचा - Goa मध्ये आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक; गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला जाणार)

ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या सामग्रीमध्ये वाळूचा खडक, संगमरवरी, कांस्य, कागदात साकारलेली शिल्पे आणि चित्रे यांचा समावेश आहे. भारतातील मोठ्या भौगोलिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या गोष्टी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या आहेत.

दरम्यान, पीएम मोदी आणि स्कॉट मॉरिसन यांच्या भेटीत भागीदारी, व्यापार आणि गुंतवणूक यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मॉरिसन द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी मोदींसोबतच्या डिजिटल बैठकीत 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणूक पॅकेजची घोषणा देखील करू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement